वाचा: Valentine’s Day ला पार्टनरला गिफ्ट करा ‘हे’ ट्रेंडी गॅजेट्स, किंमत ५,००० पेक्षाही कमी, पाहा लिस्ट
SIM Card ला त्वरित करा ब्लॉक
फोन हरवला अथवा चोरी गेल्यास सर्वात प्रथम सिम कार्डला ब्लॉक करायला हवे. कारण, तुमच्या मोबाइल नंबरचा इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी वापर करू शकते. सिम कार्ड बंद करण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अनेक गोष्टी मोबाइल नंबरशी लिंक असतात. त्यामुळे कोणीही सहज तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. सिम कार्डला ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही समान कंपनीच्या दुसऱ्या नंबरने टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करावा लागेल. समजा, तुमच्याकडे एअरटेलचा नंबर होता. तर तुम्ही इतरांच्या एअरटेल नंबरवरून टेलिकॉम ऑपरेटर्सला कॉल करून मदत घेऊ शकता.
Mobile Wallets करा बंद
स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण देखील वाढले आहे. मोबाइलच्या एका क्लिकवर सहज पैसे पाठवणे आणि रिसिव्ह करणे शक्य आहे. यासाठी आपल्या फोनमध्ये अनेक मोबाइल वॉलेट्स, बँकिंग अॅप्स असतात. तुमचा फोन हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास या अॅप्सचा वापर करून तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे अशा अॅप्सला त्वरित बंद करावे. फोनमध्ये Paytm, गुगल पे, भीम अॅप, अॅमेझॉन पे सह अनेक वेगवेगळे अॅप्स असतात. फोन चोरीला गेल्यास तुम्ही कस्टमर केअरला फोन करून या अॅप्सचा अॅक्सेस बंद करू शकता.
वाचा: ५०MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसह Realme C35 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स
वाचा: Valentine’s Day साठी Sony Headphone ची बेस्ट डील, फक्त ६०० रुपयात खरेदी करा हेडफोन
वाचा: रियलमीचे आणखी दोन फोन येताहेत, १६ फेब्रुवारीला लाँचिंग, चुकून किंमतीची माहिती उघड