फोन सर्व्हिस सेंटरला देण्याआधी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली: आज स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग झाला आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे फोनमध्ये बिघाड झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. फोनमध्ये काहीही समस्या आल्यास आपण त्वरित सर्व्हिस सेंटरला घेऊन जातो. अनेकदा सर्व्हिस सेंटर तुमच्या समोरच दुरुस्त करून फोन परत करतात. मात्र, अनेकदा काही तास किंवा दिवस फोन तेथेच ठेवावा लागतो. घाईगडबडीत आपण फोन त्यांच्याकडे सोपवतो. मात्र, यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. सर्व्हिस सेंटरला फोन दुरुस्त करण्यास देण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. फोनमध्ये आपली खासगी माहिती, बँक डिटेल्स अशा गोष्टी असतात. त्यामुळे फोन सर्व्हिस सेंटरला देण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता.

वाचा: Aadhar च्या गैरवापरापासून युजर्सना सेफ ठेवण्यासाठी UIDAI ने सुरु केली ‘ही’ सर्व्हिस, एका SMS ने होईल काम

मोबाइल डेटा आणि पर्सनल फोटो

कितीही घाई असली तरीही फोन डेटाचा बॅकअप घ्यायला विसरू नका. फोनमधील फोटो, मोबाइल नंबर, फाइल्स, व्हिडिओ इत्यादींचा बॅकअप ईमेलवर घेऊ शकता. तसेच, पर्सनल हार्ड डिस्क, लॅपटॉप अथवा अन्य मोबाइलवर देखील बॅकअप सेव्ह करू शकता. याशिवाय, मोबाइलवर पर्सनल फोटोज आणि व्हिडिओ देखील असतात. तसेच, कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणी यांच्या प्रायव्हसीची जबाबदारी देखील तुमची आहे. त्यामुळे अशा फोटो, व्हिडिओचा बॅकअप घेऊन तो डेटा डिलीट करणे गरजेचे आहे. या फोटोंचा चुकीच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो.

हेही वाचा :  तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल तर, मोबाइल नाही 'या' सेटिंग्स बदला, पाहा डिटेल्स

सिम कार्ड-मेमरी कार्ड आणि खासगी मेसेज

अनेकदा मोबाइलचे सर्व फोटो आणि डेटा डिलीट करायला वेळ मिळत नाही. जास्त डेटा असल्यास ट्रान्सफर देखील करणे शक्य नसते. फोन पूर्णपणे बंद झाल्यास हा डेटा ट्रान्सफर देखील करता येत नाही. अशा स्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचे सिम कार्ड व मेमरी कार्ड काढून घ्यायला विसरू नका. याशिवाय, आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाचे मेसेज असतात. यात बँक डिटेल्सपासून ते ओटीपीचा समावेश असतो. बँक खात्यातून केलेल्या पैशांच्या व्यवहाराची देखील माहिती असते. त्यामुळे हे सर्व मेसेज डिलीट करायला विसरू नका.

सोशल मीडिया अकाउंट आणि बँकिंग अ‍ॅप

फोनमध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सारखे अ‍ॅप्स लॉग इन केलेले असतात. जीमेल अकाउंट देखील सुरू असतात. त्यामुळे फोन सर्व्हिसिंगला देण्याआधी सर्व सोशल मीडिया अकाउंट लॉग आउट करायला विसरू नका. कारण, या अ‍ॅप्समध्ये तुमची खासगी माहिती उपलब्ध असते, ज्याचा चुकीच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो. तसेच, प्रत्येकाच्या फोनमध्ये बँक मोबाइल अ‍ॅप्स आणि मोबाइल वॉलेट असतेच. फोन दुरुस्त करायला देण्याआधी असे अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करायला विसरू नका. असे न केल्यास तुमच्या बँक खात्यातून इतर व्यक्ती पैसे काढू शकते.

हेही वाचा :  साडी नेसल्यावर जान्हवी कपूर दिसते हुबेहूब आईसारखी, साडीतले ग्लॅमरस लुक पाहून येते श्रीदेवीची आठवण

वाचा: आता स्मार्टफोन ठेवणार तुमच्या घरावर ‘वॉच’, जुन्या मोबाईलला असे बनवा CCTV, पाहा ट्रिक

वाचा: तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनला नव-नवीन कव्हर लावताय?, मग नुकसान जाणून घ्या

वाचा: जुन्या स्मार्टफोनमध्ये बदला ‘या’ सेटिंग्ज, फोन होईल नव्यासारखा, पाहा ट्रिक्स

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले…

UK Gurdwara row video : भारत कॅनडा तणावादरम्यान ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या धक्कादायक कृत्याने भारतीयांसोबत जगाला …

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस

Maharashtra Rain : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात ही परतीच्या पावसाने होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, …