तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनला नव-नवीन कव्हर लावताय?, मग नुकसान जाणून घ्या

नवी दिल्ली : स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हे वेगळे सांगायची गरज नाही. आजकाल ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, पेमेंटपासून ते शॉपिंग पर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या एका क्लिकवर करता येते. स्मार्टफोन एक गरज तर आहे. पण, काही मॉडेल असेही आहेत जे स्टेटस सिम्बॉल देखील दर्शवतात, तर काही मॉडेल्स अशी आहेत ज्यांची रचना खूप सुंदर आहे किंवा आकर्षक आहे. अशा परिस्थितीत आपला मोबाईल नेहमी स्टायलिश दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि मोबाईल अनेक दिवस चांगला राहावा यासाठी अनेक लोक त्यावर कव्हर देखील वापरतात. पण, यामुळे स्मार्टफोनचे काही अंशी नुकसान देखील होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच ३ महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. जाणून घ्या कव्हर वापरल्याने मोबाईलचे नेमके काय नुकसान होते.

वाचा: OMG! हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन लाँच, किंमत २६ हजारांपेक्षाही कमी

स्मार्टफोन जास्त वापरल्याने गरम होतो आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही मोबाईल कव्हर देखील लावले असेल तर फोन आणखी गरम होतो. उष्णतेमुळे फोनच्या कार्यक्षमतेवरही याचा परिणाम होतो. नेहमी असे होईलच हे आवश्यक नाही. परंतु, नियमीत ते वापरल्यास असे होण्याची शक्यता आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, जर फोन जास्त गरम झाला आणि त्यावर मोबाईल कव्हर असेल तर फोन आणखी गरम होईल. ज्यामुळे फोनचे नुकसान होते. अनेकदा लोक फोनमध्ये एकदाच कव्हर बसवतात आणि वर्षानुवर्षे ते स्वच्छ करत नाहीत. अशा परिस्थितीत, मागील पॅनेलवरील धुळीमुळे हळूहळू अस्वच्छता व्हायला लागते . याशिवाय, फोनवर काही वेळा ओरखडेही दिसतात. अनेकदा असे दिसून आले आहे की, लोक मोबाईलचे कव्हर एकदाच लावतात आणि नंतर ते कव्हर वर्षानुवर्षे तसेच राहते. अनेकदा युजर्स नवीन स्मार्टफोन कव्हर घेण्याचे टाळतात.

युजर्स मोबाईल कव्हर कधीच काढून स्वच्छ करत नाही. वर्षानुवर्षे मोबाईल कव्हरच्या वापरामुळे पॅनलवर धूळ साचते, त्यामुळे फोनची बॉडी खराब होऊ शकते. हँडसेट निर्मात्या कंपन्यांनी नवीन छान डिझाईनचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. जे त्यांच्या प्रीमियम लूकसह अतिशय आकर्षक दिसतात. अशा फोनच्या किमती देखील अधिक असतात. असे प्रिमिअम स्मार्टफोन्स खरेदी केल्यानंतर मोबाईल कव्हर लावल्याने फोनची रचना आणि लूक झाकला जातो. सोप्या शब्दात सांगायचे तर, कव्हरमुळे स्मार्टफोनचे लुक पूर्णपणे लपले जाते. कव्हरशिवाय, तुमचा फोन अधिक मस्त आणि स्टाइलिश दिसतो.

वाचा: या ग्राहकांना जिओ देणार दोन दिवसांची फ्री सर्व्हिस, पाहा तुम्हाला फायदा मिळणार की नाही?

वाचा: जुन्या स्मार्टफोनमध्ये बदला ‘या’ सेटिंग्ज, फोन होईल नव्यासारखा, पाहा ट्रिक्स

वाचा: १ महिन्याकरिता फ्री सर्व्हिस किंवा WiFi राउटर, तुमच्या आवडीनुसार करा निवड, पाहा ACT चा ‘हा’ ब्रॉडबँड प्लान

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Monsoon Updates : पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार; लोणावळ्यात जायचा बेत आखणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Monsoon Updates : मागील आठवड्यामध्ये जोरदार बरसलेल्या पावसानं शनिवारी कुठे दडीच मारली. रविवारी हा मान्सून …

Amravati Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरण काय आहे? का होतेय उदयपूर हत्याकांडाशी तुलना?

Amravati Murder Case: उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. दरम्यान, उदयपूरप्रमाणेच महाराष्ट्रातील अमरावती …