करोना काळात पालक गमावलेल्या पुणे विद्यापीठाच्या ५०७ विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनामुळे पालक गमावलेल्या ५०७ विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्कमाफी (pune university waived off fees), तर एक हजार १३८ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या शुल्कमाफीसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही स्वरूपातील आर्थिक मदत विद्यापीठाला करण्यात आलेली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.

पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सिनेट येत्या ३० मार्चला होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी करोनामुळे पालक गमावलेल्या किती विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत मिळाली, सवलत दिलेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयनिहाय यादी, सरकारकडून मिळालेला निधी, विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या योजना याबाबत प्रश्न विचारले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार करोनामुळे पालक गमावलेल्या ५०७ विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी देण्यात आली. एक हजार १३८ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. या संदर्भात राज्य सरकारकडून कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी उत्तरात दिली आहे.

विद्यापीठ संकुलातील सात विद्यार्थ्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात देण्यात आली. ‘कमवा व शिका योजने’बाबत सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विद्यापीठातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना क्षेत्र कार्य, कार्यालयीन कामे आणि कौशल्यावर आधारित कामे दिली जातात. त्या बदल्यात विद्यार्थ्यांना निधी दिला जातो. या योजनेत पारदर्शकता राहण्यासाठी अंगुलीद्वारे नोंदणी प्रणाली सध्या वापरली जात आहे. येत्या काळात ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. चाकणे यांनी दिली.

हेही वाचा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून विरोध

प्राध्यापकांची निम्मी पदे रिक्त

पुणे विद्यापीठाशी संलग्न एकूण कॉलेजांपैकी ३८७ कॉलेजांमध्ये ५० टक्के किंवा ५० टक्क्यांपेक्षा कमी प्राध्यापक असल्याची माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य विलास उगले यांनी दिली. सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी संलग्न महाविद्यालयांपैकी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या शिक्षकांपैकी ५० टक्के किंवा ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या महाविद्यालयांची माहिती मागितली. विद्यापीठ संकुलात शिक्षकांची २१२ पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत राजीव साबडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत

मुंबई विद्यापीठात प्राध्यापकांची ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त!gadchiroli police bharti 2022 : पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाचे आदेश जारी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …