‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश; पंजाब निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठं ‘बळ’!


पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येत्या २० फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाला मोठं ‘बळ’ मिळाल्याचं बोललं जात आहे. याला कारण ठरली आहे ती ‘दी ग्रेट खली’ म्हणून ओळख असणारा भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा याची राजकारणातली एंट्री. खलीनं आज भाजपामध्ये प्रवेश केला असून आत्तापर्यंत विरोधी रेसलर्सला फाईटच्या आखाड्यात चितपट करणारा खली आता राजकीय आखाड्यात भाजपाकडून प्रचार करताना विरोधी उमेदवाराला निवडणुकीत चितपट करण्यासाठी सज्ज झाला आहे!

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यानंतर भाजपात प्रवेश!

WWE सारख्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळणारा खली त्याची उंची आणि धिप्पाड देहयष्टी यासाठी ओळखला जातो. मात्र, आता हाच दलिपसिंग राणा उर्फ खली पंजाबमध्ये भाजपाकडून प्रचार करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खलीनं दिल्लीच्या सीमारेषांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता त्यानं भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील खलीनं केलं होतं.

२००० साली खलीनं त्याच्या रेसलिंग करिअरला सुरुवात केली होती. WWE मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी खली पंजाब पोलिसात अधिकारी पदावर कार्यरत होता. त्यानंतर WWE मध्ये त्यानं जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. खलीनं हॉलिवुडमध्ये चार चित्रपटांमध्ये तर बॉलिवुडमध्ये दोन चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. २०२१मध्ये खलीचा WWE हॉल ऑफ फेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा :  “शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस”, सुप्रिया सुळेंकडून ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

The post ‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश; पंजाब निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठं ‘बळ’! appeared first on Loksatta.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …