Vadh : अंगावर शहारे आणणारा ‘वध’चा ट्रेलर रिलीज!

Vadh Trailer Released : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता यांच्या (Neena Gupta) आगामी ‘वध’ (Vadh) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरने सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ट्रेलर पाहून त्यांना ‘श्रद्धा मर्डर केस’ची आठवण झाली आहे. 

‘वध’ या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. ‘वध’चा ट्रेलर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आहे. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये संजय आणि नीना प्रेक्षकांना थक्क करत आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेत निरागसता असली तरी ट्रेलर डार्कसाइड आहे. संजय मिश्रा पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. 


‘वध’ सिनेमाबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले,”एक अभिनेता म्हणून मी कधीही कल्पना न केलेल्या पात्राची भूमिका या सिनेमाच्या माध्यमातून मला साकारायला मिळत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नीना गुप्तांसोबत काम करायला मिळत आहे. या सिनेमाचं कथानक खूप वेगळं आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल”. 

Reels

नीना गुप्ता म्हणाल्या,”वध’ सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमाची कथा ट्रेलरमध्ये जशी जिसते त्यापेक्षा आकर्षक आहे. त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”. 

हेही वाचा :  'द कश्मीर फाइल्स'च्या वादानंतर पल्लवी जोशी यांची पोस्ट

‘वध’ 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

‘वध’ हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंह संधूने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लव रंजन आणि अंकुर गर्गने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. 

संबंधित बातम्या

Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या ‘शहजादा’ चा टीझर रिलीज; नेटकरी म्हणाले, ‘कॉपी…’Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …