King Charles III यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याबाबतची 10 रंजक सत्य अखेर जगासमोर

King Charles III Coronation : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांच्या निधनानंतर या राजघराण्याची सूत्र कोणाच्या हाती येणार यावरून पडदा उठला. किंबहुना हे फार आधीच ठरलं होतं, की राणीच्या पश्चात त्यांचे पुत्र चार्ल्स यांच्याकडे राजघराण्याचे प्रमुख म्हणून जबबादारी असून, ते या प्रांताचे राजे म्हणून ओळखले जातील. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अखेर तो दिवस उजाडला आहे जेव्हा ब्रिटनच्या शाही सिंहासनावर बसण्याचा मान (King Charles III) किंग चार्ल्स III यांना मिळणार आहे. 

6 मे 2023 रोजी एका अतिभव्य सोहळ्यामध्ये वेस्टमिंस्टर अॅबी येथे त्यांचा राज्याभिषेक पार पडेल. त्यांच्यासोबतच पत्नी कॅमिला यांनाही Queen Consort बहुमान देत त्यांनाही शाही मुकूट प्रदान करण्यात येईल. या सोहळ्यासाठी कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जगाच्या इतरही भागांतून बरीच मंडळी ब्रिटनमध्ये पोहोचली आहेत. तुम्हाला माहितीये का, ब्रिटनच्या राजघराण्याशी आणि त्यांच्या परंपरांशी काही रंजक सत्य जोडली गेलीयेत. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी हीच सत्य जगासमोर आली…. 

– 2011 मध्ये टांझानियातील मसाई समाजाकडून किंग चार्ल्स प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून आले असता त्यांना  ‘Keeper of the Cows’ हा बहुमान देण्यात आला. इथं आलं असता त्यांनी शेतात केलेल्या कामांनंतर त्यांना ही ओळख देण्यात आली. 

हेही वाचा :  शाहरुख खानच्या घनदाट केसांचे रहस्य उघड, हा एक फॉर्म्युला वापरुन 57 वर्षी देखील करतोय मुलींच्या हृदयावर राज्य

– Westminster Abbey येथे 1066 पासून ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. अॅबी तयार होण्यापूर्वी शक्य होईल त्या ठिकाणी हा सोहळा पार पडत होता. 

– शतकानुशकतांपासूनच्या परंपरेनुसार राज्याभिषेकाच्या दोन दिवस आधी राजे किंवा राणी Tower of London येथे येऊन राहत. ज्यानंतर तिथून ते राज्याभिषेकासाठी लंडनमार्गे वेस्टमिंस्टर अॅबीच्या दिशेनं जात. 

– 1937 नंतर पहिल्यांदाच किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राजांच्या पत्नी अर्थात Queen Consort यांनाही परिधान करण्यासाठी मुकूट देण्यात येईल. 

– 1937 मध्ये किंग जॉर्ज सहावे यांच्या पत्नी Queen Elizabeth यांना हा मुकूट देण्यात आला होता. 

– किंग चार्ल्स हे वयाच्या तिसऱ्या वर्षीच राजेपदाचे दावेदार ठरले होते. प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून त्यांनी सर्वाधिक काळ जबाबदारी सांभाळली. 

– राज्याभिषेकाच्या वेळी महत्त्वाची असणारी  order of service, Liber Regalis 14 व्या शतकात लॅटिन भाषेत लिहिण्यात आली होती. 

– ब्रिटनच्या शाही घराण्यातील पहिला जाहीर फोटो 20 व्या शतकाच्या सुरुवातीला सर बेंजामिन स्टोन आणि काही शिकाऊ छायाचित्रकारांनी टीपला होता. किंग जॉर्च पाचवे यांच्या राज्याभिषेकावेळी ही छाया टीपण्यात आली होती. 

हेही वाचा :  वावर हाय तर पॉवर हाय! रुबाबात बैलगाडी हाकत वऱ्हाड घेऊन निघाला नवरदेव

– मे 1937 मध्ये King George VI यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं प्रक्षेपण BBC रेडिओवरून करण्यात आलं होतं. 

–  Queen Elizabeth II यांच्या राज्याभिषेकावेळी Coronation Chicken जगासमोर आलं. जिथं करी क्रिम सॉसमध्ये थंड चिकन, राईस सॅलड, ग्रीन पीस आणि हर्ब्स या पदार्थाची मेजवानी असते. या पदार्थासाठी Minister of Works यांची परवानगीही त्यावेळी घेण्यात आली होती. 

तुम्हीही होऊ शकता ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार…  

आश्चर्याची बाब म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक सोहळा आपल्यापैकी अनेकांनी पाहिला. पण, जे त्या संधीला मुकले ते किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा पाहू शकणार आहेत. The Royal Family या युट्यूब चॅनलवर या संपूर्ण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

https://www.youtube.com/watch?v=g8HVnAXZI1I

तुम्हीही पाहणार ना हा अदभूत सोहळा? Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …