पुन्हा आला बंपर सेल! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर कुठे किती डिस्काउंट? यादीच पाहा

Amazon Great Indian Festival 2023 sale: 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झाले तर पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर काहीच दिवसांत नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल तर दसऱ्या नंतर दिवाळी साजरी करण्यात येईल. देशात सण-समारंभाना सुरुवात झाली आहे. हाच मुहूर्त साधून अनेक इ-कॉमर्स वेबसाइटने सेलची घोषणा केली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे सेल सुरू होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे हे दोन सेल सुरू होत असून यामध्ये ग्राहकांना खरेदीवर मोठी सूट मिळणार आहे. 

अॅमेझॉनने ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली असून 10 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होत आहे. दोन महिन्यांनी येणाऱ्या दिवाळीसाठी आत्तापासूनच अॅमेझॉनकडून तयारी करण्यात आली आहे. स्मार्टफोनपासून अन्य इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर सूट मिळणार आहे. जर तुम्ही प्रमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर अॅमेझॉनच्या यंदाच्या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन आणि एक्सेसरीजवर 40 टक्क्यापर्यंतची सूट मिळू शकते. तर, स्मार्टवॉच, हेडफोन आणि अन्य गॅझेट्सवर 75 टक्केपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. 

तुम्ही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यातील वेगवेगळ्या डिव्हाइसवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. इतकंच नव्हे तर, टॅबलेटवरही 60 टक्क्यापर्यंतचे डिस्काउंट मिळू शकते. येत्या काही दिवसांतच या सेलविषयीचे इतर माहितीही समोर येणार आहे. 

हेही वाचा :  Diwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल 'इतके' हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!

Oneplus 11R, samsung Galaxy s23, IQOO Neo 7 Pro,Oneplus 11, Oneplus Nord 3, Motorola Razr 40 Ultra सह अन्य स्मार्टफोन्सवर अनेक आकर्षक ऑफर्स देण्यास येणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला चांगले डिस्काउंट मिळू शकते. 

फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे

फिल्पकार्टच्या बिग बिलियन डेमध्ये स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत मिळू शकणार आहे. ज्यात Samsung Galaxy S21 FE 5G आणि iPhone वर तगडा डिस्काउंट मिळणार आहे. iPhone डिल्स 10 ऑक्टोबर रोजी कळणार आहे. Samsung आणि Realme स्मार्टफोनवरील डिल्स 3 ऑक्टोबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत लाइव्ह असतील. जर तुम्ही फ्लिपकार्टवरुन एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेलमध्ये Samsung Galaxy f54, iphone 13, Pixel 7a, Poco X5 Pro, Samsung Galaxy S23 Ultra, Pixel 7 Pro, Samsung Galaxy A34, Redmi Note 12 Pro या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्…; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

Cyber Crime Part Time Job Offer: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. …

लोणावळ्यात पछाडलेली Rolls Royce कार? 17 वर्षीय तरुणीची हत्या अन्…

Haunted Rolls Royce of Lonavala: भुताटकीचे कथित अनुभव आलेल्या जागा किंवा पछाडलेल्या जागा म्हणून कुप्रसिद्ध …