Shopping Guide : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

मुंबई : ऑनलाइन शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही? यावर घर बसल्या कुठूनही हवी ती गोष्ट आपण ऑर्डर करु शकतो. अगदी कपड्यापासून ते इलेक्टॉनिक्स आणि क़डधान्यपर्यंत लोक आता ऑनलाईन शॉपिंग करु लागले आहेत. यासाठी तुम्हाला तयार होण्याची गरज नाही, गाडी खर्च नाही. काहीच नाही. तसेच यावर डिस्काउंट मिळत असल्यामुळे लोकांमध्ये आता ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यातच आता कोरोनापासून लोकांना ऑनलाईन वस्तु मागवायची सवयच लागली आहे.

परंतु बऱ्याचदा काही लोकांना याबद्दल पूरेशी माहिती नसल्यामुळे लोकं फसवूकीला बळी पडतात किंवा स्वत:चे नुकसान करुन घेतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. ज्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान टाळू शकता.

1. ऑफरबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे

आपल्याला बऱ्याचदा अशा ऑफर्स दिल्या जाताता, त्यासाठीचे टर्मस आणि कंडिशन्स आपल्याला माहिती नसतात. ज्यामुळे आपण फक्त ऑफर मिळतेय म्हणून वस्तु खरेदी करतो. परंतु त्या ऑफरमुळे आपल्याला खरंच फायदा होणार आहे का, हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी, प्रत्येक ऑफर आणि कॅशबॅकबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, याशिवाय कंपनीकडून इतर अनेक ऑफर देखील दिल्या जातात. अशा परिस्थितीत, खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक ऑफर तपासणे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा :  पैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार, गर्भवती महिला तासभर पेट्रोलपंपावर अडकली

2. फिल्टर टूल

शॉपिंग वेबसाइटवर, तुम्हाला उत्पादन फिल्टर करण्याचा पर्याय देखील दिला जातो. खरेदी करताना हा फिल्टर पर्याय वापरून तुम्ही तुमचा शोध अधिक विशिष्ट करू शकता. यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी नको आहेत किंवा तुमच्या बजेटच्या बाहेरच्या आहेत. त्या गोष्टी पाहण्यासाठी तुमचा वेळ घालवणार नाही. तसेच यामध्ये ऑफरचा पर्याय देखील तुम्ही फिल्टर करुन तुमचा फायदा करुन घेऊ शकता.

3. लगेच पैसे देऊ नका

वस्तु आवडल्यानंतर लगेच पेमेंट करु नका.  सर्वात आधी तुम्ही डीलरशी संबंधित सर्व तपशील तपासा.  इतर वेबसाइटवर हे डीलर उपलब्ध आहे का ते देखील तपासा. अनेक वेळा अॅमेझॉन सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटवरही ग्राहक डीलरशी संबंधित फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध असल्यास तो निवडा. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

4. पेमेंट पर्यायावर लक्ष केंद्रित करा

जर डीलर खरा असेल किंवा तुम्ही प्रसिद्ध ब्रँडमधून खरेदी करत असाल तर तुम्ही ऑनलाइन पैसे देऊ शकता. यामध्ये, तुम्हाला अनेक वेळा चांगल्या ऑफर पाहायला मिळतात, तर तुम्हाला COD वर अतिरिक्त शुल्क भरावे लागते.

हेही वाचा :  एका टचने सीट होणार थंड आणि गरम, Apache ची जबरदस्त बाईक लाँच; फक्त 3100 रुपयांत करा बुकिंग

5. रिटर्न पॉलिसी तपासणे आवश्यक

कोणतेही उत्पादन ऑर्डर करण्यापूर्वी आणि पेमेंट पूर्ण करण्यापूर्वी, उत्पादनाशी संलग्न रिटर्न पॉलिसी काळजीपूर्वक वाचा. अनेक वेळा डीलर्स तुम्हाला काही दिवसांसाठी रिटर्नची सुविधा देतात. जसे की 3-4 दिवसात तुम्हाला त्या गोष्टी रिटर्न कराव्या लागतात. त्यामुळे त्या तारखेनंतर वस्तू परत करायची असेल तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

म्हणून पुढच्या वेळेपासून ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा आणि काळजी घ्या.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये

Best Battery Smartphone: स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय. तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट बॅटरी लाइफ असलेल्या …

इन्कम प्रूफ नसतानाही मिळू शकते क्रेडिट कार्ड; पण कसे? जाणून घ्या

Credit Card Tips: गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. अनेक बँकांकडून क्रेडिट …