स्मार्टफोन क्लिनिंगसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कोणतेही नुकसान न होता मिनिटात स्वच्छ होईल तुमचा फोन

नवी दिल्ली: आपण तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असतो. एवढेच नाही तर काही मिनिटे जरी स्मार्टफोन आपल्याकडे नसला तरीही अनेक कामे करणे शक्य होत नाही. मात्र, तासंतास वापरणाऱ्या या स्मार्टफोनची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अनेकदा स्क्रीनवर स्क्रॅच पडलेले असतात. तसेच, बॅक पॅनेलवर देखील बोटांचे ठसे उमटतात. त्यामुळे Smartphone ला स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी काही मिनिटात स्वतः स्मार्टफोनला स्वच्छ करू शकता. अनेकजण स्मार्टफोन खराब होईल या भितीने साफ करत नाहीत. मात्र, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज डिव्हाइसला साफ करू शकता व यामुळे फोनला कोणते नुकसानही होणार नाही.

वाचा: OnePlus करणार धमाका! आज भारतात लाँच करणार स्वस्तात मस्त स्मार्टफोन आणि टीव्ही, पाहा डिटेल्स

कॉटनचा करा वापर

तुम्हाला स्मार्टफोनवर लागलेली माती, धुळ स्वच्छ करायची असल्यास कॉटनचा वापर करा. तुम्हाला कॉटनला भिजवायचे नाहीये, तर तसेच कोरडे ठेवायचे आहे. कॉटनचा वापर करून तुम्ही सहज फोनवर लागलेली धुळ, माती स्वच्छ करू शकता. तसेच, कॉटनचा वापर केल्याने स्क्रीनवर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच पडणार नाही. तुम्ही हलक्या हाताना स्क्रीन, बॅकपॅनेल, कॅमेरा मॉड्यूल साफ करू शकता. यामुळे अवघ्या काही मिनिटात तुमचा फोन चकाचक होईल. कॉटनचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्ट वॉच, टीव्हीला देखील स्वच्छ करू शकता.

हेही वाचा :  साईंच्या घोषणेने दुमदुमली साई"पंढरी"; शिर्डीकरांनी जागविला १११ वर्षानंतर पुन्हा तो इतिहास

मायक्रो फायबर क्लोथचा करा वापर

जर तुम्ही अल्कोहल असलेल्या स्मार्टफोन क्लिनरचा वापर करत असाल तर मायक्रो फायबर क्लोथचा वापर करायला हवा. यामुळे तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीन आणि बॉडीला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचणार नाही. तुम्ही सहज चांगल्या प्रकारे स्मार्टफोनला क्लिन करू शकता. जर तुम्हाला स्मार्टफोनला स्वच्छ करताना कोणतीही अडचण येत असल्यास तुम्ही या टिप्सला फॉलो करू शकता. करोना व्हायरस महामारीच्या काळात अनेकजण स्मार्टफोनला स्वच्छ ठेवत आहेत. तुम्ही देखील या सोप्या टिप्सचा वापर करून फोनला चांगले पद्धतीने साफ करू शकता.

सॉफ्ट ब्रशचा करा वापर

तुम्ही पाहिले असेल की पेटिंगसाठी खूपच सॉफ्ट ब्रशचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे स्मार्टफोनला स्वच्छ करण्यासाठी देखील बाजारात ब्रश उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या ब्रशची किंमत देखील कमी आहे. याद्वारे तुम्ही स्मार्टफोनचा स्पीकर ग्रिल आणि मायक्रोफोनमध्ये जमा झालेली धुळ देखील काढू शकता व यामुळे डिव्हाइसला कोणतेही नुकसान पोहचणार नाही. हँडसेटच्या स्पीकरमधून व्यवस्थित आवाज येत नाहीये, असे वाटत असल्यास देखील तुम्ही स्वच्छ करण्यासाठी ही टिप्स वापर शकता. मात्र, स्क्रीन व बॅकपॅनेल साफ करण्यासाठी तुम्हाला मऊ कापडाचाच वापर करावा लागेल.

हेही वाचा :  स्मार्टफोनमधून डिलीट झाले तुमचे महत्त्वाचे फोटो? ‘या’ सोप्या स्टेप्सने करा रिकव्हर

वाचा: Samsung-Mi च्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी, किंमत ४ हजार रुपयांपेक्षा कमी; जाणून घ्या ऑफर

वाचा: ६ हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, फीचर्स मन जिंकतील; पाहा डिटेल्स

वाचा: Jio-Vi मध्ये ‘या’ सर्वात स्वस्त प्लानवरून जोरदार टक्कर, समान किंमतीत मिळतायत वेगवेगळे बेनिफिट्स

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० लाखांचे 5 कोटी होतील; पुण्यात महिलेची फसवणूक

Pune Crime News: पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, याच पुण्यात अंधश्रद्धेला बळी …

कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल

Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी …