Babu : बाबू नाय…बाबू शेठ! अंकित मोहनचा अॅक्शनपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Babu : बाबू नाय…बाबू शेठ! अंकित मोहनचा अॅक्शनपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Babu : बाबू नाय…बाबू शेठ! अंकित मोहनचा अॅक्शनपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Babu Teaser : अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. अंकित मोहनचा  ‘बाबू’ (Babu) सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सोमवारी या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

‘बाबू’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू आहे. टीझरमुळे प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बाबू’ हा एक अॅक्शनपट आहे. या सिनेमात अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. अंकित मोहन व्यतिरिक्त या सिनेमात रुचिरा जाधव, नेहा महाजनदेखील दिसणार आहे.आगरी-कोळी भागात घडणाऱ्या गोष्टींवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात  ‘बाबू’ त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

अंकित मोहन याआधी अनेक ऐतिहासिक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात रुचिरा आणि नेहा कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या सिनेमाची कथा बाबू कृष्णा भोईर यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांचे आहेत. 

संबंधित बातम्या

Thar : नेटफ्लिक्सवर बाप-लेक आमने-सामने, ‘थार’मध्ये अनिल कपूरसोबत दिसणार हर्षवर्धन कपूर

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मुलांना राहायचंय प्रसिद्धीपासून दूर, पापाराझींना टाळण्यासाठी अरिन आणि रायनची खास युक्ती

Upcoming Movies on OTT: ‘बच्चन पांडे’ ते ‘गंगूबाई काठियावाडी’ पर्यंत ‘हे’ सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

हेही वाचा :  पाकिस्तानातील कार्यक्रमात मुंबई हल्ल्याबद्दल बोलले जावेद अख्तर

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …