मालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्याने केली बाप-लेकाची हत्या, असा झाला उलगडा

नाशिक : Nashik Murder News : कोट्यवधीची संपत्ती हडपण्याच्या हेतूने मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खून शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Neighbors kill father and son to seize property at Nashik)

बाप-लेकाची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच ईमारतीत राहणाऱ्या संशयित राहुल जगताप याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. नानासाहेब कापडणीस हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव होते. तसेच मुलगा अमित कापडणीस एमबीबीएस पदवीधारक होता. त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्यांना त्यांचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नानासाहेब कापडणीस यांच्या शेजारी राहणाऱ्या राहुल जगताप याच्याशी अवघ्या महिनाभराच्या आत ओळख झाली होती. राहुल जगताप याने  कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी साधारणत: आठवडाभराच्या अंतरावर राहुल जगताप याने त्यांचे खून केले होते. विशेष म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्हीही मृतदेह वेगेवेगळ्या जिल्ह्यात फेकून दिले होते. 

नानासाहेब कापडणीस यांचा पालघर जिल्ह्यात तर मुलाचा मृतदेह नगर जिल्ह्यात फेकून दिला. हे प्रकरण इथवरच थांबले नाही तर राहुल जगताप याने कापडणीस यांचे व्यवहार हाताळत मालमत्ता हडप करण्याचा पराक्रम सुरू केला होता. कापडणीस यांचे सुरू असलेले बांधकाम आणि त्याचा व्यवहार तर मोबाइलमध्ये असलेले शेयर मार्केट, बँक खाती हे सुद्धा हाताळत लाखो रुपये हडपण्याचे काम सुरू केले होते.

हेही वाचा :  सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचं सात्विक घर, सोबर आणि मनमोहक मांडणी

मयत यांचे नातेवाईक म्हणजेच आई आणि बहीण हे अमेरिकेत राहतात. ते वर्षानुवर्षे येणार नाहीत, त्यामुळे सगळे काही हडप करत स्वतः नानासाहेब कापडणीस आहे म्हणून राहुल जगताप याने सुरुवात केली होती. मात्र मुंबईतच राहत असलेले आई आणि बहीण यांनी वडिलांना आणि मुलाला कॉल केले. मात्र संपर्क न झाल्याने नाशिकमध्ये येऊन पाहिले. मात्र संपर्क न झाल्याने ते पोलिसांना न कळविताच निघून गेले होते. 

त्यानंतर मात्र महिना उलटून गेला. काहीच संपर्क होत नसल्याने त्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर शोध आणि तपास सुरु झाला. पोलिसांनी दोन जिल्ह्यात फेकून दिलेल्या मृतदेहासह टेक्निकल गुन्ह्याची उकल केली. या खूनाचा छडा हा मृतांचे झालेले व्यवहारावरुन लागला. पोलिसांनी मृतांकडून व्यवहार कसे झाले, हाच धागा धरून नाशिक पोलिसांनी तपासाची कामगिरी सुरु केली आणि खून्याला अटक केली, अशी माहिती नाशिक शहर परिमंडळ-1चे पोलीस आयुक्त अमोल तांबे यांनी दिली.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

ठाणे : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील (Asia) सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समुह विकास …

शेतकऱ्यांनो, पेरणी करताना सावधान! तुमचं बियाणं बोगस तर नाही?

Bogus Seeds : जे पेराल तेच उगवतं, असं म्हणतात. मात्र कधी कधी यात फसवणूकही होऊ …