दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले

Minor Girl Found After 2 Years: ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियावर (Social Media) मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फूस लावून पळवून नेले. (Love Affair) उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये (Uttar Pradesh) राहणारी ही तरुणी लातूर (Latur) जिल्ह्यात सापडली आहे. एका चिठ्ठीवरुन तब्बल दोन वर्षांनंतर तिच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले आहे. 

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी घर सोडून पळून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. त्याचवेळी पालकांना तिच्या खोलीत एक कागद सापडला त्यावर दोन फोन नंबर लिहले होते. त्यानंतर त्यांनी त्या फोन नंबरवर फोन करण्याचा संपर्क केला. 

आरोपीची मुलीच्या आई-वडिलांना धमकी

अल्पवयीन मुलीच्या पालकांनी त्या क्रमांकावर फोन करताच मुलीच्या प्रियकराने फोन उचलला व त्यांना धमकवायला सुरुवात केली. आरोपी युवकाने  त्याचे नाव शेख असे सांगितले तसंच, तो हैदराबाद येथून बोलत आहे, असा दावा केला. त्याचबरोबर, त्यांची मुलगी त्याच्यासोबत असून तिला पुन्हा घरी यायचं नाहीये, असं म्हटलं. इतकंच नव्हे तर, मुलीच्या वडिलांना मुलीला विसरुन जा नाहीतर परिणाम वाईट, अशी धमकीदेखील दिली. 

हेही वाचा :  'आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने...'; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या

लातूर कनेक्शन सापडले

आरोपीच्या धमकीनंतर मुलीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २०२१लाच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपासही सुरू केला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी तरुण हा लातूर जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे. 

तब्बल दोन वर्ष घेतला शोध

दोन वर्षांपर्यंत पोलिस दोघांना शोधत होती. कारण आरोपीने त्या दिवसानंतर तो फोन वापरला नव्हता. २९ मे रोजी पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांना आरोपीचा पत्ता सापडला. 

पोलिसांनी रचला सापळा

आरोपीचा पत्ता सापडल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत लातूर जिल्ह्यातील बडुरे गावातून अटक केली आहे.आरोपीचे नाव दस्तगीर शेख असे असून गेल्या दोन वर्षांपासून तो तरुणीवर लैंगिक अत्याचार करत होता. पोलिसांनी तरुणीची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. 

सलग दोन वर्ष केले लैंगिक अत्याचार

पोलिसांनी पॉक्सोअंतर्गंत बलात्कार व अपहरणाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यापूर्वी गोरखपूर जिल्ह्यात राहत होता. फेसबुकच्या माध्यमातून तो अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होता. तिच्यासोबत मैत्री करुन तिला फूस लावून पळवून नेले त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. 
 

हेही वाचा :  मुंबईत राहणाऱ्या पतीसोबत कडाक्याचे भांडण, पत्नीने तीन मुलांचा जीव घेतला अन् मग...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …