500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला पठाण

Pathaan Box office Collection Day 22 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

पठाण 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील

‘पठाण’ने रिलीज झाल्यानंतर 22 व्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 502.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. पठाण हा वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये 1000 कोटींचा टप्पा पार करेल, असं देखील म्हटलं जात आहे. आता पठाण चित्रपट भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानं यशराज फिल्म्स मोठा निर्णय घेतला आहे. 

यशराज फिल्म्सचा मोठा निर्णय

पठाण चित्रपट भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर यशराज फिल्म्सने या चित्रपटांच्या तिकीट दराबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शुक्रवारी (17 फेब्रुवारी) हा चित्रपट प्रेक्षकांना 110 रुपयांमध्ये बघता येणार आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस आणि आणखी काही या थिएटर्समध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट 110 रुपयांमध्ये पाहता येईल, अशी माहिती यशराज फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. 


पठाण या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांमधील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शाहरुखने पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :  विषारी किड्याला हात लावताच हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक

शाहरुख खानचे आगामी चित्रपट

पठाणच्या यशानंतर शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आता पठाण प्रमाणेच शाहरुखच्या इतर आगामी चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच त्याच्या चाहत्यांना मिळेल. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Pathan Fans in Germany: कडाक्याच्या थंडीत जर्मनीमधील चाहते थिरकले ‘झुमे जो पठाण’वर; व्हायरल व्हिडीओला शाहरुखची भन्नाट कमेंट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …