Yamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price

Yamaha Tricity: जपानी वाहन निर्मिती कंपनी Yamaha ने आपली प्रसिद्ध तीन पायांची स्कूटर Yamaha Tricity रेंजला अपडेट करत लाँच केलं आहे. या रेंजमध्ये Tricity 125 आणि Tricity 155 यांचा समावेश आहे. दोन्ही स्कूटरमध्ये इंजिन क्षमतेव्यतिरिक्त काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही तीन चाकांची स्कूटर 2014 मध्ये सर्वात प्रथम लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून ही स्कूटर जागतिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये पुढील बाजूस दोन आणि मागे एक चाक देण्यात आलं आहे. जाणून घ्या या स्कूटरमध्ये नेमकं काय खास आहे. 

दोन्ही स्कूटरचं डिझाइन बऱ्याच प्रमाणात सारखं आहे. यामध्ये सेंटर-सेट LED हेडलाइट, LED डे टाइम रनिंग लाइट आणि LCD सेंटर कंसोल देण्यात आला आहे. यामध्ये सिंगल सीटसह इंटिग्रेटेड ग्रॅब रेल देण्यात आला आहे, जो मागे बसणाऱ्याला मदतशीर ठरेल. नव्याने अपडेट केल्यानंतर स्कूटरच्या डिझाइनला थोडा स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. 

पॉवर अॅण्ड परफॉर्मन्स

Tricity 125 मध्ये कंपनीने पहिल्याप्रमाणेच 125cc सिंगल सिलेंडरयुक्त लिक्विड कूल्ड इंजिन वापरण्यात आलं आहे, जे 12.06bhp पॉवर और 11.2Nm चा टॉर्क जनरेट करतं. दुसरीकडे Tricity 155 मध्ये कंपनीने 155cc क्षमतेचं सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 14.88bhp ची पॉवर आणि 14Nm का टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. 

हेही वाचा :  महत्वाचे ! Aadhaar कार्डशी असे लिंक करा Voter ID कार्ड, प्रोसेस खूपच सोपी

हेच इंजिन R15 मध्ये मिळतं. मात्र R15 मध्ये या इंजिनला अशाप्रकारे बसवण्यात आलं आहे की, ते 18.1 bhp ची पॉवर जनरेट करतं. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही स्कूटर स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञानयुक्त आहेत. 

यमाहाच्या या Tricity रेंजच्या फ्रंटला 14 इंचाचा अलॉय व्हील देण्यात आलं असून आणि मागील भागात 13 इंचांचा अलॉय व्हील दिला आहे. वळण घेताना कोणतीही अडचण येऊ नये अशा पद्दतीने फ्रंट व्हील डिझाईन करण्यात आलं आहे. दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. फ्रंटला टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि मागील चाकाप्रमाणे डुअल शॉक ऑब्जर्व्हर सस्पेंशन देण्यात आलं आहे. फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कीलेस एंट्री सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

किंमत किती?

जपानी बाजारात Tricity 125 ची किंमत 4,95,000 येन म्हणजेच जवळपास 3 लाख 10 हजारांच्या जवळपास असेल. दुसरीकडे Tricity 155 ची किंमत 5,56,500 येन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 3 लाख 54 हजार इतकी असेल. सध्या जपानी बाजारात या स्कूटर्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. 

28 फेब्रुवारीपासून Tricity 125 ची विक्री सुरु होणार आहे. तर Tricity 155 ची विक्री 14 एप्रिल 2023 पासून सुरु होईल. ही स्कूटर भारतात कधी लाँच होणार असा विचार करत असाल तर तुमची निराशा होईल. भारतीय बाजारात अशा स्कूटर्सना फार कमी मागणी आहे. यामुळे त्यांना भारतात लाँच करण्याचे कोणतेही संकेत नाहीत.

हेही वाचा :  तुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …