Auto: अप्सरा आली! ‘या’ लटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटी पाहून असेच म्हणाल; समोर भारी भारी टू व्हिलर फिक्या पडतील

Auto News: हल्ली बाजारात नानाप्रकारच्या स्कुटी, गाड्या, कार्स उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये (Auto Market) भरपूर ऑप्शन्स मिळू लागले आहेत. आता सगळीकडे इलेक्ट्रिक कारची क्रेझ सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडेच स्वस्त आणि मस्त स्कूटर्सही उपलब्ध झाल्या आहेत. सध्या अशाच एका इलेक्ट्रिक कारची सगळीकडेच चर्चा आहे. ही स्कूटर तुम्हाला फक्त 45, 000 मध्ये मिळू शकते. सध्या या स्कुटीची सर्वत्र चर्चा आहे. चला पाहूया या स्कुटरच फिचर्स (Scooter Features) नक्की कसे आहेत. यंदा इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ देशात हळूहळू वाढू लागली आहे. त्याचसोबत आता पर्यावरणपुरक अशा परिस्थितीत लोकं सायकलही विकत घेत असताना आता लोकं अधिक पर्यावरणपुरक स्कुटर्सकडेही वळत आहेत. आता बाजारातही नव्या इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत आणि लोकंही त्या विकत घेत आहेत. काही इलेक्ट्रिक वाहनं महागही आहेत पण त्याच बरोबर काही वाहनं ही स्वस्त देखील आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार केला तर बाजारात अनेक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. 

काय आहेत या इलेक्ट्रिक कार? 

1. एव्हॉन ई स्कूटची (Avon E-Scooter) किंमत 45,000 रुपये इतकी आहे. या कंपनीचा दावा आहे की या स्कुटरची रेंज 65 किमीची आहे. त्या स्कुटरचा टॉप स्पीड 24KMPH आहे. स्कूटरची 215W BLDC इतकी मोटर आहे आणि ती 48V/20AH बॅटरीसह येते. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात.

हेही वाचा :  इतरांपासून लपवून ठेवा फोनमधील महत्वाचे Apps, प्रायव्हसीसाठी फॉलो करा भन्नाट ट्रिक्स

2. बाउंस अनंत E1 ची किंमत 45,099 रुपयांपासून सुरू होते. बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 68,999 रुपये आहे. हे 2kWh/48V बॅटरीसह येते. कंपनीचा दावा आहे की स्कूटरचा टॉप स्पीड 65kmph आहे आणि रेंज 85km आहे.

3. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्सची (Hero Electric) किंमत 62,190 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की स्कूटरचा टॉप स्पीड 45 KM/H आहे आणि रेंज 82KM आहे. यात तीन रंगांचे पर्याय आहेत. ही 51.2V/30Ah बॅटरीसह येते जी 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

4. बिग EX, यात एलसीडी स्क्रीन, इंटिग्रेटेड यूएसबी पोर्ट, कीलेस एंट्री आणि अँटी थेफ्ट अलार्म मिळतो. हे 1.2 kW मोटरसह येते. त्याचा टॉप स्पीड 55 किमी/तास आहे. यात 60V, 30Ah बॅटरी आहे, जी 121 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची किंमत 73,999 रुपये आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे …