Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार की नाही? जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्या असल्या तरी तेलाच्या किरकोळ किंमती वाढत आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड 78 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत (Petrol Diesel Price) अनेक शहरांमध्ये बदल दिसून येत आहेत. देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. देशातील चार महानगरांसह सर्व शहरांमध्ये इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 प्रति लिटर आणि डिझेल 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये दराने विकले जात आहे.

मंगळवारी कच्च्या तेलावर हिरव्या रंगाचे चिन्ह दिसत आहे. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.27 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रति बॅरल 74.35 डॉलरच्या वर आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.19 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे आणि ते प्रति बॅरल  78.65 डॉलरवर व्यापार करत आहे.

हेही वाचा :  'मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,' मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर...

या शहरात बदलले पेट्रोल डिझेलचे भाव

अहमदाबाद – पेट्रोल 1 पैशांनी महागले 96.51 रुपये, डिझेल 1 पैशांनी महागले 92.25 रुपये
अजमेर – पेट्रोल 24 पैशांनी 108.38 रुपये, डिझेल 22 पैशांनी स्वस्त होऊन 93.63 रुपये प्रति लिटर झाले आहे.
नोएडा – पेट्रोल 35 पैशांनी 96.65 रुपये, डिझेल 32 पैशांनी 89.82 रुपये स्वस्त
गया – पेट्रोल 67 पैशांनी 107.94 रुपये, डिझेल 62 पैशांनी 94.69 रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे.
गोरखपूर – पेट्रोल 10 पैशांनी 96.81 रुपये, डिझेल 10 पैशांनी 89.99 रुपये स्वस्त
गुरुग्राम – पेट्रोल 29 पैशांनी 97.18 रुपये, डिझेल 29 पैशांनी 90.05 रुपये प्रतिलिटर महागले आहे.
जयपूर – पेट्रोल 2 पैशांनी 108.43 रुपये, डिझेल 2 पैशांनी 93.67 रुपये स्वस्त झाले आहे.
लखनऊ- पेट्रोल 10 पैशांनी 96.57 रुपये, डिझेल 10 पैशांनी स्वस्त होऊन 89.76 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

महाग पेट्रोलपासून दिलासा कधी मिळणार?

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लवकरच देशात पेट्रोलचे दर 15 रुपयांपर्यंत खाली आणले जातील. मात्र, हे कधी होणार याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. किंचित बदल सोडता 18 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 18 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

हेही वाचा :  चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …