Mohammed Rafi : स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी!

Mohammed Rafi Birth Anniversary : मोहम्मद रफी (Mohammed Rafi) हे स्वर्गीय आवाजाची देणगी दाभलेले लोकप्रिय पार्श्वगायक होते. त्यांच्या निधनाला आज अनेक वर्षे झाली आहेत. पण तरीही त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट आहे. 

मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील एका गावात झाला. मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने पुढे भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने साऱ्यांनाच मोहत पाडले. त्यांनी उस्ताद वाहिद खान यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले आहेत. त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदा गाणं गायलं. 

आवाजाचा जादूगार!

मोहम्मद रफी यांनी ‘गुल बलोच’ या पंजाबी सिनेमात ‘सोनिये नी हिरीये नी’ हे पहिलं गाणं गायलं. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी ‘हिन्दुस्तान के हम है पहले आप के लिए गाया’ हे गाणं गायलं. त्यानंतर त्यांनी असंख्य गाण्यांच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू दाखवून दिली. 

हेही वाचा :  Ved : रितेश-जिनिलियाने चाहत्यांना याड लावलं

मोहम्मद रफी यांनी पाच हजार हिंदी गाण्यांसह एकूण 25 हजार गाणी गायली आहेत. त्यात मराठी, उर्दूसह अनेक भाषांतील गाण्यांचा समावेश आहे. देशभक्तीपर गीते, रोमॅंटिक गाणी, कव्वाली, गझल अशा वेगवेगळ्या प्रकारांत त्यांनी गाणी गायली आहेत. जगभरात त्यांचे चाहते आहेत. 

News Reels

हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतलं जातं. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठ्या संख्येने लाभला. 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आवाजाच्या जादूगाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. 

मोहम्मद रफी यांच्या निवडक गीतांचा नजराणा…

– क्या हुआ तेरा वादा
– बहारों फुल बरसाओ…
– बाबूल की दुवाएँ लेती जा…
– ये रेशमी झुल्फे…
– उडे जब जब जुल्फे तेरी…
– ओ दुनिया के रखवाले…
– शिर्डीवाले साईबाबा…
– रामजी की निकलीसवारी…
– हा रुसवा सोड सखे…
– अच्छा जी मै हारी…
– हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा
– हसा मुलांनो हसा
– नको भव्य वाडा

हेही वाचा :  'सनी' चित्रपटाचे शो रद्द झाल्यानं चिन्मय आणि ललितचा संताप

संबंधित बातम्या

Mohammed Rafi : जगाचा निरोप घेण्याआधी मोहम्मद रफींनी ‘हे’ गाणं केलं होतं रेकॉर्ड ; वयाच्या 13 व्या वर्षी केला पहिला परफॉर्मन्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …