‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हनी सिंह? व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण

Honey Singh: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) त्याच्या गाण्यांनी नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. हनी सिंहच्या (Yo Yo Honey Singh) स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हनी सिंह आणि त्याची एक्स वाईफ शालिनी तलवार (Shalini Talwar) यांचा घटस्फोट काही दिवसांपूर्वी झाला. घटस्फोटानंतर आता हनी सिंह एका तरुणीच्या प्रेमात पडला आहे, असं म्हटलं जात आहे. 

हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी यांचा व्हिडीओ व्हायरल 
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी (Tina Thadani)  हे एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहेत. या दोघांनी नुकतीच दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

कोण आहे टीना थडानी? 
टीना ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. टीनानं हनी सिंहच्या पेरिस का ट्रिप या गाण्यामध्ये काम केलं. या गाण्यानंतर हनी आणि टीना यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, असं म्हटलं जात आहे. अजून हनी सिंह आणि टीना यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 

हेही वाचा :  अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'पुष्पा 2'साठी तीन गाणी तयार 

पाहा व्हायरल व्हिडीओ: 

News Reels


हनी सिंहने गायलेली ‘हाय मेरा दिल’, ‘ब्राउन रंग’, ‘हाय हील्स’, ‘ब्रेकअप पार्टी’, ‘ब्रिंग मी बॅक’, ‘ब्लू आईज’, ‘पार्टी ऑन माय माइंड’, ‘लुंगी डान्स’, ‘पार्टी ऑल नाइट’, ‘सनी सनी’, ‘चार बॉटल वोडका’, ‘पार्टी विथ भूतनाथ’, ‘आता माझी सटकली’, ‘बर्थडे बॅश’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Honey Singh Divorced : ‘रॅप किंग’चा घटस्फोट; 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने घेतला निर्णय

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …