अंगभर कपडे घालूनही मलायकावर भडकले चाहते, म्हणाले “अगं लाज बाळग…”

बॉलिवूड फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी स्टारच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये अनेकांनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये सर्वानीच फॅशनेबल कपडे परिधान केले होते. पण नेहमीच आपल्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना घायाळ करणाऱ्या मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण यावेळी अंगभर कपडे घालूनसुद्धा मलायका चर्चेचा विषय ठरली. मलायकाच्या ड्रेसवर असणारी प्रिंट पाहून सर्वांनीच भुवया उंचावल्या. (फोटो सौजन्य- योगेन शहा)

​कसा होता मलायकाचा लुक

या पार्टीत मलायकाने व्हाईट कलरचा एक पोलो नेक टॉप परिधान केला होता. व्हाईट कलरच्या या टॉपमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. पण या टॉपवर असणाऱ्या प्रिंटमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. खरं तर मलायकाने परिधान केलेला हा ड्रेस ‘बॅलेन्सियागा’ balenciaga या ब्रँडचा आहे. वादामध्ये असलेल्या या ड्रेसचा वापर केल्याने मलायकाचे चाहते तिच्यावर नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. (वाचा :- Anushka Sharma Qala: ‘कोई कैसे उन्हे समझाये..’ म्हणत विराटच नाही तर लाखोंची धडकन बनली अनुष्का! मधुबालाची आली आठवण)

हेही वाचा :  समृद्धी महामार्गावर अपघात का होतात? अभ्याासानंतर धक्कादायक वास्तव समोर...

​मलायकाची हेअरस्टाईल आणि मेकअप

यावेळी मलायकाने तिचे सुंदर केस मोकळे सोडले होते. तर मलायकाने स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक लावून तिचा लुक पूर्ण केला. तर तिने लाल रंगाची नेटपॅलिश लावून हटके लुकने लक्ष वेधले. (वाचा :- Anushka Sharma Qala: ‘कोई कैसे उन्हे समझाये..’ म्हणत विराटच नाही तर लाखोंची धडकन बनली अनुष्का! मधुबालाची आली आठवण )

​लेदर लॉंग शूजने वेधले लक्ष

मलायकाच्या ब्लॅक शूजने तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली. एखाद्या पार्टीला वन पिसवर तुम्हीदेखील असे फॅशनेबल लेदरचे शूज परिधान करु शकता. (वाचा :- कंबरेत कट असलेल्या ड्रेसमध्ये मराठमोळ्या सईचा ग्लॅमरस जलवा, तुम्हीपण म्हणाल हिच्या समोर मलायकापण पानीकम)

​का भडकले नेटकरी

मलायकाचा हा लुक पाहून सोशल मीडियावर अनेक जण तिच्यावर नाराज झालेले पाहायला मिळाले. मलायका अरोरा हिने ‘बॅलेन्सियागा’ या फॅशन ब्रँडचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता आणि या ब्रँडवर मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. या ब्रँडच्या एका ब्रँडींग दरम्यान या विषयावर बराच गदारोळ झाला होता आणि आता चाहत्यांच्या लाडक्या मलायकाने हा टॉप परिधान केल्यानंतर तिचे चाहते नाराज झालेले पाहायला मिळाले. (वाचा :- ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?)

हेही वाचा :  Bhumi Pednekarचा इंटरनेटवर धुमाकुळ, प्रिंटेड साडी आणि रिवीलिंग ब्लाऊज पाहून चाहत्यांनी ही रोखले श्वास

​काय आहे लोकांचे म्हणणे

मलायकाच्या या लुकवर @debbolicious या युजरने Balenciagaचा ड्रेस घालण्याची ही योग्य वेळ नाही असे म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने @soniyadoshi ”अगं थोडी तरी लाज बाळग” अशी कमेंट केली आहे. (वाचा :- मनिष मल्होत्राच्या पार्टीत श्वेता बच्चनने वेधले सर्वांचे लक्ष, तिच्या पुढे मलायकाचा ग्लॅमरस अंदाजपण फिका)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …