Gyanvapi Mosque Case: ‘कार्बन डेटिंग’ म्हणजे काय रे भाऊ?

Gyanvapi Carbon Dating: साधापण वर्षभरापूर्वी वाराणसीतील ज्ञानवापी (Gyanvapi Mosque) येथे शिवलिंगाची आकृती सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हाच मुद्दा देशभर प्रखतेने चर्चेत राहिला होता. काही संघटनांनी आक्रमण भूमिका घेत सत्य शोधण्याची विनंती केली होती. प्रकरण कोर्टात गेलं. एका याचिकाकर्त्याने शिवलिंगाच्या आकृतीची कार्बन डेटिंगची (Carbon Dating) मागणी केली होती. त्यानंतर कोर्टानं त्याची मागणी फेटाळून लावली होती, अशातच आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) शुक्रवारी ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर वाद प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.  

ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Carbon Dating) सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाच्या आकृतीची कार्बन डेटिंग करावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे आता कार्बन डेटिंग म्हणजे नेमकं काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Carbon Dating म्हणजे काय? 

कार्बन डेटिंग (Carbon Dating) म्हणजे एखाद्या वस्तूचं वय शोधणं. एखादी वस्तू किती वर्षापासून सजीव होती? सध्याचं तिचं वय काय? हे शोधण्यासाठी कार्बन डेटिंग या पद्धतीचा वापर केला जातो. कार्बन हा एक रेडिओऍक्टिव्ह एलेमेंट आहे. जसं जसं त्या सजीव वस्तूचा क्षय व्हायला लागतो तस तसं हा कार्बनही कमी व्हायला लागतो. त्यामुळे त्याच्या आयसोटोपमध्ये झालेल्या बदलावरून त्याचं वयोमान काढणं शक्य असतं.

मृत्यूनंतर शरीरात असणाऱ्या कार्बन-12 आणि कार्बन-14 चं गुणोत्तर बदलं जातं. त्यावरून त्याचं वय काय असेल, याचा शोध घेता येऊ शकतो. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा मुस्लिम संघटनांनी केला आहे. 

हेही वाचा :  चेहऱ्यावर वार, कवटीला फ्रॅक्चर; रक्ताच्या थारोळ्यात आढळली महिला कॉन्स्टेबल, न्यायाधीशांना WhatsApp मेसेज अन्...

आणखी वाचा – Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगचा व्हिडिओ आला जगासमोर

दरम्यान, आपल्या पृथ्वीच्या वातावरणात कार्बनचे तीन समस्थानिक आढळतात. ते कार्बन-12, कार्बन-13 आणि कार्बन-14 म्हणून ओळखले जातात. कार्बन डेटिंगच्या पद्धतीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 मधील गुणोत्तर काढलं जातं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …