10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

Kolhapur Crime News : कोल्हापूर मधील आजरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाठलाग करत तब्बल 10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी (whale fish vomit) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  फ्लोटिंग गोल्ड म्हणून व्हेल माशाची उलटी (Whale Vomit) समजली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे. व्हेल माशाच्या उलटीवर विक्री आणि तस्कारीसाठी बंदी आहे

अशी केली पोलिसांनी कारवाई

विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेली व्हेल माशाची उलटी अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तब्बल 10 कोटी 74 लाख 10 हजार किमतीची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आजपर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई मनाली जात आहे. 

कोल्हापूर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 10 किलो 688 ग्रॅम इतके व्हेल माशांची उलटी जप्त केली आहे. या प्रकरणी कुडाळच्या पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आजरा पोलिसांन अंबोली – आजरा मार्गावर सापळा रचत ही कारवाई केली आहे.

हेही वाचा :  मी मराठा; पाठीमागून वार करीत नसल्याचे सतेज पाटील यांचे आवाडे यांना प्रत्यत्तुर

साताऱ्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणा-या चौघांना अटक

साता-यामध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणा-या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी उलटीच्या तस्करीसाठी  रुग्णवाहिकेचा वापर करायचे. पोलिसांनी जवळपास 5 कोटी 43 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.ॉ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण मसुरे वेरळ इथे व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकानं ही धडक कारवाई केली होती. या प्रकरणात 9 संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून 24 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी, काही वाहने असा २५ कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

व्हेल माशाची उलटीला कोट्यावधीची किंमत का मिळते?

एम्बरग्रीस, किंवा व्हेलची उलटी, व्हेलच्या आतड्यात उद्भवणारा एक घन मेणासारखा पदार्थ आहे. व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनाच्या निर्मीतीत वापरले जाते. तसेच हे कामोत्तेजक मानले जाते आणि त्याचा काही औषधांमध्येही वापर केला जातो. 



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन भारताने कॅनडाबरोबरच अमेरिकेलाही झापलं; जयशंकर म्हणाले, ‘ते दिवस गेले जेव्हा…’

India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील सदस्य देशांना दहशतवाद, कट्टरतावादी आणि …

…अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

EMU train climbs on platform: उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे जंक्शनवर मंगळवारी रात्री एक विचित्र अपघात …