नव्या संसद भवनाचे आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन, 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सकाळी साडे सात वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नवं संसदभवन त्रिकोणाकृती असणार आहे. नवीन इमारतीमध्ये प्रशस्त जागा आणि अत्याधुनिक सुविधा आहेत. लोकसभेत एकूण 888 आणि राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतात. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर मुख्यमंत्री आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा तुम्ही ‘झी 24 तास’वर पाहू शकणार आहात. या  उदघाटनावर 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. 

नव्या संसदेत स्थापित करण्यात येणारा सेंगोल अर्थात राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तामिळनाडूच्या अधीनम मठाच्या संतांनी मोदी यांच्याकडे हा सेनगोल सोपवला आहे. मंत्रोच्चारांमध्ये हा राजदंड मोदींकडे सोपवण्यात आला. आज तामिळ रिवाजांनुसार हा सेंगोल नव्या संसद भवनामध्ये स्थापित केला जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हा राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दिला होता. 

काँग्रेस , तृणमूल काँग्रेस (TMC), आम आदमी पार्टी (AAP) आणि इतरांसह 19 विरोधी पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित न केल्यामुळे नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा :  "मी RAS टॉपर आहे, तुम्ही सगळे अशिक्षित...", अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल; तरुणीला दिली धमकी

सोमवारी नवीन संसद भवनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मोदी सरकारने औचित्याचा वारंवार अनादर केला आहे. भाजप-आरएसएस सरकारच्या काळात भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यालय टोकनवादात कमी झाले आहे.

बहिष्काराचे आवाहन करताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ट्विट केले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित न करणे हा त्यांचा मोठा अपमान आहे. हा देखील आदिवासींचा अपमान आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्ष उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे.

दरम्यान, अभिनेता शाहरूख खानने नव्या संसदेचं वर्णन आशेचं नवं घर असं केलंय. शाहरूख खानने नव्या संसद भवनानिमित्त स्वतःच्या आवाजात एक व्हिडिओ तयार करत शुभेच्छा दिल्या आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …