समृद्धी महामार्गावर अपघात का होतात? अभ्याासानंतर धक्कादायक वास्तव समोर…

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग  (Samruddhi ExpressWay) प्रवासांसाठी खुला झाला आणि लाखो प्रवाशांनी या महामार्गावरुन प्रवास सुरु केला. पण त्याचबरोबर अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली.  शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अपघातांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. 

अपघातांच्या कारणांचा शोध
समृद्धी महामार्गवरील अपघातांना नेमकी कोणती कारण जबाबदार आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायला हवी. समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याबाबत नागपुरातील व्हीएनआयटी (VNIT)संस्थेच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांनी प्राध्यापक विश्रुत लांडगे त्यांच्या मार्गदर्शनात अभ्यास आणि संशोधन केलं आहे. 

या अभ्यासात अपघातांच्या कारणांमध्ये काही धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या प्रज्वल मडघेग, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत आणि आयुष दूधबावरे या चार विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गांवरील अपघातांचे कारण आणि त्यावरील काही उपाय अभ्यासांती सुचवल्या आहे. त्यांनी समृद्धीवारील 100 किलोमीटरचा 3 महिने विस्तृत अभ्यास केला.

समृद्धीवर अपघातांची प्रमुख कारणं
समृद्धी महामार्गावर दिवसाला सरासरी 9 अपघात होतात. गेल्या तीन महिन्यात अपघातात 37 मृत्यू झाले आहेत. गंभीर स्वरुपाचे 112 अपघात झालेत. यात सकाळी  8 ते 10 दरम्यान 34 टक्के अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर Highway Hypnosis महामार्ग संमोहनमुळे म्हणजे एकसुरी ड्रायव्हिंगमुळे 32 टक्के अपघात झाल्यांचं नोंद झाली आहे. टायर फुटल्यामुळे 34 टक्के तर लेन चेंज करताना 40 टक्के अपघात झाले आहे. चालकाचं लक्ष विचलीत झाल्याने 24 टक्के अपघात झाले असून यात 8 टक्के अपघात हे मोबाईल हाताळताना झालेत.

हेही वाचा :  केंद्र सरकारचा 'डिजिटल स्ट्राइक', युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी

अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी?
अपघात टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी काही उपायही सुचवले आहेत. 

– ड्रायव्हिंग करताना एकसुरीपणा टाळण्यासाठी varibale मेसेज साइन ,स्क्रीन डिस्प्ले लावणे

– वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा असणं

– गाड्यांमध्ये समोरील एअर बलून बरोबर साइड सेफ्टी गरजेची

– वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर उपाययोजना उदा. cctv, स्पीड कॅमेरा

– महामार्ग नियमाबाबत चालकांना माहिती असणे

वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली
समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास 80 किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास 120 किलोमीटरची वेगमर्यादा नेमूण देण्यात आली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणे, नियमाचे उल्लंघन करून अन्य वाहनांना मागे टाकणे अशा काही कारणांमुळे या महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …