शिव ठाकरेचे स्टाईल स्टेटमेंट होतेय व्हायरल, खेळच नाही तर फॅशनबाबतही होतेय चर्चा

शिव ठाकरे हा बिग बॉस १६ मधील टॉप स्पर्धकांपैकी एक मानला जात आहे. मैत्रीला जागणारा आणि योग्य तिथे डोकं आणि मन वापरून खेळ खेळणारा अशीच शिवची ओळख आहे. याआधी मराठी बिग बॉसचा विजेता म्हणून शिवकडे पाहिले जाते. मात्र हिंदी बिग बॉसमध्येही शिवने आपल्या खेळाने आणि वागण्याने एक जम बसवला आहे आणि केवळ प्रेक्षकच नाही तर अगदी सेलिब्रिटीशी शिव ठाकरेला पाठिंबा दर्शवत आहेत आणि त्याच्या खेळाबाबत बोलत आहेत. पण मराठमोळ्या शिवच्या केवळ खेळाचीच नाही तर त्याच्या स्टाईलचीही सध्या सर्वत्र चर्चा आहे. सामान्य माणसाला आवडेल अशी साधीसुधी आणि तरीही कम्फर्टेबल स्टाईल शिवने बिग बॉसमध्ये फॉलो केली आहे.

जॅकेट स्टाईल

मराठमोळ्या शिवला बरेचदा ‘विकेंड का वार’ मध्ये जॅकेटची स्टाईल करताना पाहिलं गेलं आहे. शिवच्या व्यक्तीमत्त्वाला जॅकेट अत्यंत शोभून दिसत आहे. हा वेस्टकोट अप्रतिम दिसत असून तुम्हीदेखील अशा पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमात घालू शकता. शिव अशा वेस्टकोटमध्ये अधिक हँडसम दिसत असून पुन्हा एकदा हे वेस्टकोट ट्रेंडमध्ये आले आहेत.

हेही वाचा :  एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता

(वाचा – वीणा शिवसाठी उभी राहिलीच! रडू नकोस मी आहे.. वीणाच्या एका पोस्टने झाले सगळेच खूश)

ट्रेंडी फुल स्लीव्ह्ज टी-शर्ट

शिव बॉडीबिल्डर असून त्याला टी-शर्ट अत्यंत सुंदर दिसतात आणि त्यामुळेच शिव बरेचदा फुल स्लीव्ह्जमध्येही दिसून येतो. घरात टास्क नसेल तेव्हा असे ट्रेंडी टी-शर्ट शिव घालतो. स्ट्रीप्स असणारे टी-शर्ट अथवा गडद रंगाचे आणि फिकट रंगाचे टी-शर्ट अधिक प्रमाणात शिव वापरताना दिसतो. टास्कदरम्यानदेखील शिव अनेकदा प्रिंटेड टी-शर्ट वापरताना दिसून येतो. बरेचदा त्याच्या टी-शर्टच्या डिझाईन्सविषयी घरातदेखील एकमेकांशी चर्चा होताना दिसून आली आहे. शालिनने शिवला त्याच्या कपड्यांची निवड उत्तम असल्याचेही सांगितले आहे.

(वाचा – Bigg Boss 16: मन जिकलं पण शो हरणार शिव ठाकरे? प्रेक्षकांनाही स्पष्ट दिसतायंत ही कारणं)

जंपसूट

सहसा मुली जंपसूटचा पर्याय निवडताना दिसतात. पण मुलांमध्येही जंपसूटची फॅशन आहे आणि शिवने ती उत्तमरित्या कॅरी केली आहे. कुठेही अवघडलेपणा न येता शिवने हा जंपसूट घातला असून अतिशय आरामदायी असा हा दिसून येत आहे. त्यामुळे मुलांमध्येही आता जंपसूटची फॅशन अधिक प्रमाणात फॉलो केली जाऊ शकते. एखाद्या पार्टीला अथवा बाहेर आऊटिंगसाठी जंपसूट हा उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा :  Bigg Boss 16: कोण आहे शिव ठाकरे? न्यूजपेपर, दूध विकून केली करिअरची सुरुवात

(वाचा -ढसाढसा रडला शिव ठाकरे! त्याच्या मनातल्या वेदना ऐकून तुमच्या काळजाचंही होईल पाणीढसाढसा रडला शिव ठाकरे! त्याच्या मनातल्या वेदना ऐकून तुमच्या काळजाचंही होईल पाणी)

हाफ स्लीव्ह्ज चेक्स शर्ट

चेक्सचे शर्ट मुलांमध्ये नेहमीच आवडीचे असतात. पण त्यातही चेक्सचे हाफ स्लीव्ह्ज असतील तर ते बाहेर जाताना उत्तम दिसतात. तसंच जिममध्ये जाणारी मुलं असतील तर बायसेप्स दिसण्यासाठी आणि स्टाईलसाठी असे शर्ट्स अधिक चांगले दिसतात. शिवने देखील घातलेला हा लाल चेक्सचा हाफ स्लीव्ह्ज चेक्सचा शर्ट त्याची कम्फर्ट लेव्हल दाखवून देत आहे. यासह जीन्स मॅच केल्यास हा लुक अधिक उठावदार दिसतो.

(वाचा – बिग बॉस १६ च्या घरातच नव्हे घराबाहेरही शिव ठाकरेचीच हवा! असा रेकॉर्ड करणारा पहिलाच स्पर्धक)

फुल स्लीव्ह्ज हुडी

बिग बॉसच्या घरात एसी कायम फुल असतो हे बिग बॉस चाहत्यांना माहीतच आहे. त्यामुळे शाल अथवा स्वेटर घालून आपली स्टाईल झाकोळण्यापेक्षा हुडी हा पर्याय उत्तम ठरतो. शिव अनेकदा वेगवेगळ्या स्टाईलच्या हुडी वापरतानाही दिसतो. यामुळे स्टाईलही दिसून येते आणि थंडीपासूनही रक्षण होते. प्लेन हुडीपेक्षा प्रिंटेड हुडी अधिक लक्षवेधी ठरतात.

हेही वाचा :  कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक 'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन!

शिवची स्टाईल तुम्हालाही आवडली असेल तर तुम्हीही ती फॉलो करू शकता. तसंच मुलांसाठी स्टाईल करताना फारच कमी पर्याय उपलब्ध असतात असे म्हटले जाते. पण शिवची फॅशन पाहता आता वेगवेगळे पर्याय मुलांनाही उपलब्ध झाले आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही!

(फोटो क्रेडिटः Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …