Bigg Boss 16: कोण आहे शिव ठाकरे? न्यूजपेपर, दूध विकून केली करिअरची सुरुवात

Shiv Thackeray career : सलमान खानचा शो बिग बॉस १६ आपल्या रोमांचक वळणावर आहे. यामध्ये बिग बॉस मराठी सीझन २ चा विजेता शिव ठाकरे देखील प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे. शिव अगदी सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळताना दिसतो. अलीकडेच शिव आणि अर्चना गौतम यांच्यात मोठी भांडण झाली. प्रेक्षक अजूनही स्पर्धकांचा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान शिव ठाकरे कोण आहे? त्याच्या शिक्षण आणि करिअरविषयी जाणून घेऊया.

शिवने करिअरच्या सुरुवातीला डान्स कोरिओग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट केले आहे. याशिवाय त्याच्या पापांच्या पानाच्या दुकानातही तो आपल्या बहिणीसोबत बसायचा. तसेच आपण बहिणीसोबत वर्तमानपत्र विकले, दुधाची पाकिटेही विकल्याचे त्याने एका शो दरम्यान सांगितले होते.

शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या सीझन २ चा विजेता ठरला होता. या सत्राचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर शिव प्रकाशझोतात आला. शिव ठाकरे डान्सर आणि कोरिओग्राफरही आहे. शिवाचा जन्म ९ सप्टेंबर १९८९ रोजी अमरावती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मनोहर ठाकरे. शिवने आपले प्रारंभिक शिक्षण अमरावती येथून केले. त्यांनी नागपूरच्या महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. शिवने वडिलांच्या आनंदासाठी इंजिनीअरिंग केले, पण त्याला नेहमीच अभिनेता व्हायचे होते.

हेही वाचा :  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लावला पर्यावरणस्नेही बॅटरीचा शोध

‘वेडात मराठे…’मध्ये वीर म्हणून झळकणार सत्या महेश मांजरेकर, कितवी शिकलाय जाणून घ्या

एमटीव्ही रोडीज रायझिंग मधून सुरुवात

शिव ठाकरेने एमटीव्ही रोडीज रायझिंग या टीव्ही रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये तो रणविजय सिंगच्या गँगमध्ये होता. आपल्या रोडीज प्रवासाबद्दल बोलताना शिवाने सांगितले की, त्याला इथपर्यंत पोहोचायला पाच वर्षे लागली. शिवाने उपांत्य फेरी गाठली होती पण तो शो जिंकू शकला नाही. शिवने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, मला नकारात्मक भूमिका करायची आहे.

शिव हा व्यवसायाने डान्सर आहे. त्याने स्वतःचा डान्स स्टुडिओ उघडला आहे. त्याने अनेक शोमध्ये भाग घेतला आहे. शिव एक फिटनेस फ्रीक आहे. त्याला वर्कआउट करायला आवडते. तो अनेकदा त्याचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आप, शिवसंग्राम, ठाकरे गट ते शिंदे गट; दिपाली सय्यद यांच्या करिअरविषयी जाणून घ्या
Success Story: रिक्षा चालकाच्या मुलाने रचला इतिहास, परिस्थितीवर मात करत बनला सर्वात तरुण IAS

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …