एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता

Bigg Boss-16: बिग बॉस-16  (Bigg Boss-16)  च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 ची विजेती ठरल्यानं आता त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे एमसी स्टॅनचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. 

शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16  (Bigg Boss 16) चे टॉप-5 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे.  एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाटा या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली. 


बिग बॉस-16 च्या विजेता एमसी स्टॅनला कलर्सच्या आयकॉनची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीवर गोल्ड युनिकॉर्नचा लोगो आहे. तसेच विजेत्याला ग्रँड आय 10  निओस (Grand i10 Nios) ही गाडी देखील मिळणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 


एमसी स्टॅन हा त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याचा ’80 हजार के जूते’ हा सोशल मीडियावर डायलॉग खूप व्हायरल झाला होता.  एमसी स्टॅनचे शूज, टी-शर्ट आणि बेल्ट या वस्तू अनेकांचे लक्ष वेधतात.

हेही वाचा :  नवीन तारक मेहता दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 16: बिग बॉस 16 विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम किती? कुठे पाहता येणार ग्रँड फिनाले? जाणून घ्या…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …