IND vs NZ, T20 Live Streaming: आज रंगणार निर्णायक टी20; कधी, कुठे पाहाल तिसरा टी20 सामना?

IND vs NZ 3rd T20 Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ यांच्यात सुरु टी20 मालिकेतील (IND vs NZ T20 Series) तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. आज भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. टी20 मालिकेत तीन पैकी दोन सामन्यातील प्रत्येकी एक सामना जिंकून भारत आणि न्यूझीलंड मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत, ज्यामुळे आज रंगणारा तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. भारताने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. श्रीलंकेला टी20 मध्ये मात देऊन एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिल्यानंतर न्यूझीलंडलाही वन-डे मध्ये व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता टी20 मालिका जिंकण्यासाठी भारत आज न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. तर या महत्त्वाच्या टी20 या सामन्याची माहिती जाणून घेऊ… 

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा तिसरा टी20 (India vs New Zealand 1st T20) आज अर्थात, 1 फेब्रवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

हेही वाचा :  पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर

कुठे आहे सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 13 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. याशिवाय एका सामना बरोबरीत देखील सुटला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …