Kiss Day 2023: चुंबन घेण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या किस डे चे आरोग्यासाठी महत्त्व

वॅलेंटाईन विकमध्ये १३ फेब्रुवारीचा दिवस ‘Kiss Day’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या जोडीदारासाठी आपल्या मनात काय भावना आहेत हे उत्कंठावर्धक अशा चुंबनातून व्यक्त करण्याने नक्कीच प्रेम वाढतं. जोडीदारासाठी असणारे प्रेम यातून व्यक्त होते. मात्र किस करण्याचे इतकेच महत्त्व नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक शारीरिक समस्या दूर करण्यापासून ते ३४ फेशियल मसल्स आणि शरीरातील ११२ पोस्चर्स सक्रिय करण्यासाठी किसचा फायदा होतो. यामुळे मांसपेशी टाईट आणि टोन्ड राहतात. तर चुंबन घेतल्याने रक्तप्रवाह जलद वाढतो आणि त्वचा अधिक तरूण दिसू लागते. जाणून घ्या चुंबन करण्याचे आरोग्यदायी फायदे (फोटो सौजन्य – Freepik.com)

​चुंबन घेतल्याने वाढते प्रतिकारशक्ती​

​चुंबन घेतल्याने वाढते प्रतिकारशक्ती​

चुंबन घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. २०१४ च्या मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार सांगण्यात आले की, ओठांवर किस घेताना जोडीदारांची लाळ एकमेकांमध्ये मिक्स होते. यामध्ये कमी प्रमाणात किटाणू असतात, ज्याच्या संपर्कात आल्यानंतर प्रतिकारशक्तीच्या विरोधात अँटीबॉडी तयार होणे सुरू होते. किस केल्याने शरीरातील या किटाणूमुळे आजाराचा धोका कमी होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा :  शुभमंगल सावधान! पूजा सावंत या महिन्यात चढणार बोहल्यावर, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

​किस घेतल्याने तणाव होतो कमी ​

​किस घेतल्याने तणाव होतो कमी ​

किस केल्याने नैराश्य आणि ताण या दोन्ही गोष्टी कमी होण्यास मदत मिळते. कोर्टिसोल हार्मोनमुळे आपल्यातील तणाव वाढताना दिसून येतो. पण जेव्हा जोडीदार एकमेकांचे चुंबन घेतात अथवा मिठी मारून प्रेम व्यक्त करतात, तेव्हा मेंदूतील कोर्टिोसलची पातळी कमी होऊ लागते. यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन मुक्त होतात आणि तणावापासूनही मुक्तता मिळते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर मूड ताजा होतो. तसंच बेचैनी आणि अनिद्रेचा त्रास असल्यास कमी होतो.

(वाचा – Hug Day 2023: मिठी मारल्याने नातीच सुधारतात असं नाही, आरोग्याला मिळतात हे ४ फायदे)

​चुंबन घेतल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो ​

​चुंबन घेतल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो ​

ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी किस घेणे हे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. किसिंग तज्ज्ञ आणि लेखक अँड्रिया डिमिर्जियनने सांगितल्याप्रमाणे जेव्हा चुंबन घेतले जाते तेव्हा हृदयाची गती वाढते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या रूंद होतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहाते.

(वाचा – डायबिटीस रुग्णांना इन्शुलिनची कधी गरज भासते? वयानुसार किती असावे इन्शुलिनचे प्रमाण)

​कोलेस्ट्रॉल कमी होते​

​कोलेस्ट्रॉल कमी होते​

चुंबन सीरम कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी करण्यास मदत करते. हृदयरोग आणि स्ट्रोकच्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी याचा फायदा होतो.

हेही वाचा :  Toxic Relationships संपवण्यासाठी लोक 4 वर्षे वाट पाहतात, संशोधनातून समोर आलेले सत्य वाचून तुमचाही थरकाप उडेल

(वाचा -Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सत्तूचे ड्रिंक ठरेल वरदान, डायबिटीस रूग्णांसाठीही फायदेशीर)

​मेटाबॉलिजम मजबूत करण्यासाठी​

​मेटाबॉलिजम मजबूत करण्यासाठी​

किसिंग केल्याने मेटाबॉलिजम स्ट्राँग होण्यास मदत मिळते. Passionate Kiss दरम्यान जास्त कॅलरी बर्न होतात अर्थात कॅलरी अधिक जळतात. एक मिनिट चुंबन घेतल्यास, ५ कॅलरी बर्न होते. आपल्या नॉर्मल रूटीनने जी कॅलरी कमी होते, त्यापेक्षा ही दुप्पट आहे. यामुळेच मेटाबॉलिजम सुधारते आणि तुम्हाला एक वेगळा आनंदही मिळतो.

टीप – हे मेडिकल रिसर्च आणि शोधानुसार लेखात लिहिण्यात आले आहे. आम्ही अशा दाव्याची कोणतीही पुष्टी देत नाही. हा लेख केवळ माहितीकरिता देण्यात आला आहे.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …