बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही दिसली बप्पीदांची जादू, ‘गोल्डन सिंगर’बद्दल ‘या’ गोष्टी माहितीये

Bappi Lahari : ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते सावरतच होते की, बप्पी लाहिरींच्या (Bappi Lahari) जाण्याने पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये वयाच्या 69व्या वर्षी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लेहरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेले 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.

तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीताची जादू बॉलिवूडचं नाही, तर हॉलिवूडमध्येही दिसली होती.

हेही वाचा :  Raj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा

वयाच्या तिसऱ्यावर्षी तबला शिकण्यास सुरुवात!

बप्पी लाहिरी यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 11व्या वर्षी संगीत तयार करण्यास सुरुवात केली. किशोर कुमार हे बप्पी लाहिरी यांचे नातेवाईक होते, ज्यांनी त्यांना संगीत शिकवले. तसेच, बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यात मदत केली. बप्पी लाहिरी यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते, नंतर, त्यांनी आपले नाव बदलून बप्पी लाहिरी केले, हे फार कामी लोकांना माहीत असेल.

बॉलिवूड संगीताला दिली वेगळी दिशा!

बप्पी लाहिरी हे त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध होते. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः खुलासा केला होता की, त्यांच्यावर एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा खूप प्रभाव होता. त्यांना पाहिल्यानंतर बप्पीदांनी स्वत:ची स्टाईल तयार केली. ते गळ्यात किमान 7 ते 8 चेन घालत असे. बप्पीदा हे भारतीय चित्रपट विश्वातील एकमेव संगीतकार होते, ज्यांना संगीताला पॉप फ्लेवर देण्याचे श्रेय दिले जाते. त्यांच्या या प्रयोगाने बॉलिवूडची दिशाच बदलली.

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये नोंद!

1986 मध्ये बप्पीदांनी 33 चित्रपटांतील 180 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या या कामगिरीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये झाली आहे. संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांनी सुमारे साडेसहाशे चित्रपटांना संगीत दिले आहे. हिंदी, बंगाली व्यतिरिक्त त्यांनी जवळपास सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच, 5000हून अधिक गाणी रचली आहेत.

हेही वाचा :  मुंबईत 'Gandhi Godse Ek Yudh'च्या स्क्रीनिंग दरम्यान गदारोळ

हॉलिवूडवरही केली जादू

बप्पी लाहिरीच्या संगीताची जादू केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही होती. ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील बप्पीदांचे प्रसिद्ध गाणे ‘जिम्मी जिम्मी आजा आजा’ हे 2008मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट ‘यू डोंट मेस विथ द जोहान’मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. ज्युलियस डोबोस यांनी याचे संगीत तयार केले होते. जगप्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सनच्या गाण्याने आणि डान्सने जगाला वेड लावले असताना, मायकल मात्र बप्पी लाहिरींच्या ‘डिस्को डान्सर’ या गाण्याचा मोठा चाहता होता.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …