‘डिस्को’ सिंगर हरपला! शेकडो गाण्यांना संगीताचा साज; अनेक गाणी गायली, बप्पीदांची सदाबहार गाणी

Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (वय 70) यांचे काल रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जुहू येथील क्रिटी बाप्पी लाहिरी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. 

बप्पीदा यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिलं. तसेच अनेक गाणीही स्वत: गायली. त्यातली कित्येक गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. 

बप्पी लाहिरी यांनी गायलेली दहा सदाबहार गाणी

‘बंबई से आया मेरा दोस्त…’, 
‘देखा है मैंने तुझे फिर से पलट के तू मुझे जान से भी प्यारा है…’, 
‘याद आ रहा है तेरा प्यार…’,
‘सुपर डांसर आये हैं आये हैं…’ 
‘जीना भी क्या है जीना…’
‘यार बिना चैन कहां रे…’
‘तम्मा तम्मा लोगे…’
‘प्यार कभी कम मत करना…’,’दिल में हो तुम…’
 ‘बंबई नगरिया…’,
‘उलाला उलाला…’ 

संगीताचा साज असलेली अनेक गाणीही सुपरहिट 
अनेक गाणी बप्पीदा यांनी गायली. त्यांच्या संगीताचा साज असलेली अनेक गाणीही सुपरहिट ठरली आहेत. यात  ‘आओ तुम्हे चांद पे ले जाएं’, ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातो में…’, ‘पग घुंघरू बांध मीरा नाची थी’ ‘जिमी जिमी जिमी आजा आजा…’ ‘आइ.एम.ए डिस्को डांसर…’, ही गाणी विशेष ठरली.  1984 मध्ये‘शराबी’सिनेमातील संगीतासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वश्रेष्ठ संगीतकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदापर्ण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या ‘उ लाला’ हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांसाठी गाणी संगीतबद्ध केली. बप्पी यांनी 2014 साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Aishwarya Rai Bachchan : अशी निरागस होती ऐश्वर्या; पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल

Aishwarya Rai Bachchan Photo On Passport : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) …

Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा ‘लडकी : ड्रॅगन गर्ल’ चीनमध्ये होणार प्रदर्शित

Ladki The Dragon Girl : सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर …