पिझ्झा डिलिव्हरी बॉयसाठी घराचा दरवाजा उघडताच; अंगावर काटा आणणारा Video Viral

Pizza Delivery Boy Robbed Viral Video : भय इथंल संपत नाही…असंच म्हणायची वेळ आली आहे. आता आपल्याच घरात आपण सुरक्षित नाही. इथे कोणावर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडला आहे. रोज दारावर कधी इस्त्रीवाला, तर कधी पोस्टमॅन येतो. आपण अनेक वेळा घरी जेवण बनविण्याचा कंटाळा आला तर बाहेरून जेवणाची ऑर्डर देतो अशा वेळी डिलिव्हरी बॉय घरी येऊन पार्सल देऊन जातात. 

आपल्या दारावर येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या ओळखीचा असो वा नसो त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे हे कसं समजणार. इथे प्रत्येक संबंध विश्वासावर चालतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये दारावर येणाऱ्या या व्यक्तींमुळे घरफोडींच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

घरातील सदस्याने भूक लागली म्हणून पिझ्झा ऑर्डर केला. ते वाट पाहत असतानाचा दारावर बेल वाजते पिझ्झा देण्यासाठी डिलिव्हरी बॉय आलेला असतो. म्हणून ते दार उघडण्यास जातात. पण दार उघडल्यानंतर त्यांचा पायाखालची जमिनीच सरकते. 

जसं घरातील सदस्य दरवाजा उघडतात तो डिलिव्हरी बॉय बंदुक काढून त्यांचावर हल्ला करत घरात शिरतो. दारावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये घरातून गोळीबाराचा आवाज येतोय. (Pizza Delivery Boy Robbed house video viral on internet trending now)

हेही वाचा :  मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...

या डिलिव्हरी बॉयने तोंडाला मास्क धारण केला आहे आणि त्याचा हातात पिझ्झाचा बॉक्स दिसत आहे. पण त्या बॉक्सच्या आड त्याने बंदूक लपवलेली असते. तो जबरदस्ती घरात घुसतो आणि लुटमार करतो. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 19 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये पुढे काय झालं हे मात्र समजू शकलेलं नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …