IPL Auction: “…तर शाहीन आफ्रिदीला २०० कोटी मिळाले असते”; भारतीय म्हणाले, “एवढ्यात पूर्ण पाकिस्तान येईल”

IPL Auction: “…तर शाहीन आफ्रिदीला २०० कोटी मिळाले असते”; भारतीय म्हणाले, “एवढ्यात पूर्ण पाकिस्तान येईल”


२००९ च्या आयपीएल पर्वानंतर भारतीय प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय. पण दरवेळी होतो तसा पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख यंदाही झालाय.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामासाठी नुकताच महालिलाव पार पडला. या दोन दिवसीय महालिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना अगदी कोट्यावधीची बोली लावून संघ मालकांनी आपल्या संघात स्थान दिल्याचं यंदाच्या लिलावामध्ये पहायला मिळालं. मात्र या लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश नव्हता. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. तरीही जर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला किती बोली मिळाली असती याबद्दल पाकिस्तानच्या एका पत्रकाराने व्यक्त केलेलं मत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

नक्की पाहा >> Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?

२००९ च्या आयपीएल पर्वानंतर भारतीय प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय. मात्र दर आयपीएल लिलावाच्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची चर्चा होतानाचं चित्र पहायला मिळतं. अनेकदा पाकिस्तानचा हा खेळाडू असता तर एवढे कोटी मिळाले असते तो असता तर एवढी रक्कम मिलाली असती अशी वक्तव्य पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि पत्रकांकडून केली जाते. असच एक वक्तव्य आता पाकिस्तानमधील पत्रकार इत्साम उल हकने केलंय. सध्या त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून भारतीय त्याला ट्रोल करतायत.

हेही वाचा :  एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा

क्की वाचा >> IPL 2022 Auction: “माझ्यासाठी १३ कोटींची बोली लावल्यानंतर लिलाव थांबावा असं वाटतं होतं, कारण…”

क्रिकेटबद्दल विशेष आवड असणाऱ्या इत्साम उल हकने ट्विटरवर, “आयपीएल लिलावामध्ये शाहीन शाह आफ्रिदीचा समावेश असता तर तो २०० कोटींना विकला गेला असता,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> IPL 2022 Auction: “…म्हणून आम्ही रैनाला विकत घेतलं नाही”; धोनीच्या CSK ने केला मोठा खुलासा

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय फलंदाजांना चांगलच अडचणीत आणलेलं. मात्र थेट २०० कोटी रुपये मिळण्याइतका चांगला गोलंदाज तो नाही असं स्पष्ट मत भारतीयांनी या पत्रकाराच्या ट्विटखाली व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> IPL Auction 2022: गब्बरची जब्बर कमाई… चौपट अधिक किंमत मिळत ठरला लिलाव झालेला पहिला खेळाडू

एकाने म्हटलंय की एवढ्या पैशात तर पाकिस्तान विकत येईल.

अन्य एकानेही एवढ्यात तर पाकिस्तान येईल असं म्हटलंय.

दुसऱ्या एकाने २०० कोटीत किती शून्य असतात माहितीय का असा प्रश्न विचारलाय.

एका पकिस्तानी चाहत्याने आपण आयपीएलऐवजी पीएसएलबद्दल बोललं पाहिजे असं म्हटलंय.

हेही वाचा :  समीर वानखेडेंना मोठा धक्का; ठाण्यात गुन्हा दाखल

अन्य एकाने या पत्रकाराला तोंड बंद ठेवलं तर बरं होईल असा सल्ला दिलाय.

नक्की वाचा >> IPL Auction 2022: शाहरुखच्या KKR ला मिळाला मुंबईकर कॅप्टन?; तब्बल १२.२५ कोटींना संघात दिलं स्थान

२००९ च्या आयपीएल पर्वापासून पाकिस्तानी खेळाडूंना या जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाहीय. दोन्ही देशांमधील राजकीय तणाव यामागील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातं. अनेकदा आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी देण्यासंदर्भातील भाष्य दोन्ही देशांमधील खेळाडूंकडून करण्यात आलंय मात्र त्यानंतरही ही बंदी कायम आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link