Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून हरियाणाची ‘शकीरा’ गोरी नागोरी आऊट!

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या घरातून नृत्यांगना गोरी नागोरी (Gori Nagori) बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर गोरीने शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतमवर (Archana Gautam) निशाणा साधला आहे. 

‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर गोरीने मराठमोळ्या शिव ठाकरेवर निशाणा साधला आहे. शिव ठाकरे आणि अर्चना गौतमला ती सरड्यासारखे रंग बदलणारे स्पर्धक असं म्हणाली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत गोरी म्हणाली,”बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास जितका चांगला तितकाच वाईट आहे. या खेळासाठी मी माझी मर्यादा ओलांडू शकत नाही. 


Reels

गोरी नागोरीचं खरं नाव काय आहे? 

गोरी नागोरी ही लोकप्रिय नृत्यांगना आहे. तिने राजस्थानी आणि हरियाणवी म्युझिक व्हिडिओ केले आहेत. तिचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिचं खरं नाव गोरी मलिकं असं आहे. 

बिग बॉसच्या घरात अर्चना गौतमची पुन्हा एन्ट्री

शिव ठाकरेसोबतच्या वादामुळे अर्चना गौतमला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. पण नुकत्याच पार पडलेल्या वीकेंडच्या वारमध्ये सलमानने अर्चनाला तिची चूक दाखवली. तसेच शिव ठाकरेचीदेखील शाळा घेतली. अर्चना गौतमच्या एन्ट्रीने शिव ठाकरेचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. अर्चनाची एन्ट्री त्यांच्या पसंतीस उतरलेली नाही. 

हेही वाचा :  Salman Khan ची हायकोर्टात धाव, डीएन नगर पोलिसात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका

साजिद खानच्या सहभागामुळे झाला होता गोंधळ

बिग बॉसच्या घरात साजिद खानने एन्ट्री घेतल्यापासून लोक प्रचंड संतापले आहेत. खरं तर, 2018 मध्ये त्याच्यावर MeToo चे आरोप झाले होते. 9 हून अधिक अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यामुळे सलमान खान आणि बिग बॉसला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यातच आता साजिद खानचा खेळ दिसत नसल्याने सलमान खानने साजिद खानची शाळा घेतलेली आहे. 

संबंधित बातम्या

Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …