Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि डान्समुळे चर्चेत आहे. अशातच त्याने त्याच्या नव्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. ‘पुरी गल बात’ ‘Poori Gal Baat’ असे या गाण्याचे नाव आहे. लवकरच टायगरची अनेक रोमॅंटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
टायगरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये टायगर श्रॉफ मौनी रॉयसोबत रोमान्स करताना दिसत आहे. मौनी तिच्या लग्नानंतर पहिल्यांदाच टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. ‘पुरी गल बात’ गाण्याचा टीझर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
टायगरचे आगामी प्रोजेक्ट
‘हिरोपंती 2’ सिनेमात टायगर श्रॉफसह अभिनेत्री तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील दिसणार आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर साधला निशाणा
The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित
Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

