स्पेन ते फ्रान्स; आठ देशांमध्ये झालंय शाहरुखच्या ‘पठाण’चं शूटिंग!

Shah Rukh Khan Pathaan Budget : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमचा (John Abrham) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून आजही बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुखचं आहे. शाहरुखच्या अभिनयापासून ते सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्सपर्यंत वेगवेगळ्या कारणाने हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता सात झाले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या सिनेमाचं शूटिंग कुठे झालंय, सिनेमासाठी शाहरुखने किती मानधन घेतलं आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

‘या’ ठिकाणी झालंय ‘पठाण’चं शूटिंग (Pathaan Shooting Venue)

यशराजच्या बॅनरखाली ‘पठाण’ची निर्मिती करण्यात आली आहे. यशराज नेहमीच त्यांच्या सिनेमाचं शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात. ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगसाठीदेखील त्यांनी खूप अभ्यास केला आहे आणि वेगवेगळ्या जागांची निवड केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आठ देशांमध्ये ‘पठाण’ सिनेमाचं शूटिंग झालं आहे. यात स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या प्रमुख देशांचा समावेश आहे. 

हेही वाचा :  अश्नीर ग्रोव्हर नव्या भूमिकेत, शेअर केला व्हिडीओ

‘पठाण’ सिनेमाचं बजेट काय आहे? (Pathaan Movie Budget) 

‘पठाण’ या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. एखाद्या हॉलिवूड सिनेमाप्रमाणे या सिनेमाची बांधणी करण्यात आली आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने जगभरात 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण या सिनेमाची निर्मिती फक्त 250 कोटींमध्ये करण्यात आली आहे. एकंदरीतच बजेटपेक्षा खूपच जास्त कमाई या सिनेमाने केली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या वीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाने भारतात 328 कोटींची कमाई केली आहे. येत्या दिवसांत या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी वाढ होणार आहे. 

‘पठाण’ सिनेमासाठी शाहरुखने किती मानधन घेतलं आहे? (Shah Rukh Khan Fees)

‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. ‘पठाण’आधी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा ‘झीरो’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुखने चार वर्षांनी ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला. या सिनेमासाठी त्याने 60 कोटी मानधन घेतलं आहे. तर दीपिका पादुकोणने 15 कोटी, जॉन अब्राहमने 20 कोटीचं मानधन घेतलं आहे. तर या सिनेमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचीदेखील झलक पाहायला मिळत आहे. पण या सिनेमासाठी सलमानने मानधन घेतलेलं नाही. 

हेही वाचा :  'नाना मी..'; वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाल्यानंतर मुलगी मंजुलाची भावनिक पोस्ट

‘पठाण’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार!

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘पठाण’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 100 कोटींमध्ये या सिनेमाचे ओटीटी राइट्स अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने विकत घेतले आहेत. सध्या जगभरात ‘पठाण’ सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Pathaan: रेकॉर्डब्रेक कमाईनंतर ‘पठाण’च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; रिलीजच्या सहाव्या दिवशीच तिकीट दरात घट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …