शाहरुख खानच्या ‘Pathaan’च्या तिकीट दरात घट!

Shah Rukh Khan Pathaan Ticket Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 600 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. रेकॉर्डब्रेक कमाईमुळे आता या सिनेमाचे तिकीट दर कमी झाले आहेत. 

‘पठाण’ सिनेमाने रिलीजच्या आधीच 24 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी कमबॅक केल्याने तसेच, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाबद्दल उत्सुकता असल्याने सिनेरसिकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. आता या सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पठाण’ या सिनेमाचं तिकीट हजारो रुपये असतानाही चाहते सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘पठाण’ या सिनेमाचे तिकीट दर सोमवापासूनच म्हणजेच, रिलीजच्या सहाव्या दिवशी 25 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शाहरुखचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन जल्लोष करत सिनेमा पाहत आहेत. तिकीट दर कमी झाले असले तरी सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये फरक पडलेला नाही. 

हेही वाचा :  कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिलात? सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

सिनेमाचे तिकीट दर कसे कमी होतात?

एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सरकारकडूनच तो सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित केला जातो. अनेकदा डिस्ट्रिब्यूटर त्यांचा नफा कमी करुन घेतात. त्यामुळे तिकीट दरात घट होते. एखाद्या सिनेमाच्या तिकीट दरात घट झाली तर त्याचा फायदा त्या सिनेमालाच होतो. कारण कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त लोक तो सिनेमा पाहतात. जास्त तिकीट विकले गेले की, सिनेमाच्या कमाईत वाढ होते. 

‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘दृश्यम 2’ला तिकीट दर कमी केल्याचा फायदा

23 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टीप्लेक्स ऑफ इंडियानं (MAI) एक मोठा निर्णय घेतला होता. 4000 पेक्षा अधिक स्कीन्सवर सिनेरसिकांना फक्त 75 रुपयांत सिनेमा पाहता आला होता. तिकीट दर कमी असल्याने त्यादिवशी सर्वच सिनेमागृहांत हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला होता. ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमाने रिलीजच्या 14 दिवसांत 3.15 कोटींची कमाई केली होती. तर पंधराव्या दिवशी ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ होता. त्यादिवशी या सिनेमाने 10 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. त्यामुळे एका दिवसांत या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली होती. ‘ब्रह्मास्त्र’सह ‘भूलभुलैया 2’ आणि ‘दृश्यम 2’ या सिनेमांनादेखील तिकीट दर कमी झाल्याचा फायदा झाला होता. 

हेही वाचा :  Kantara On OTT : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' आता ओटीटीवर!

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pathaan : ‘बेशरम रंग’ ते बॉयकॉटच्या धमक्या! अ‍ॅक्शन आणि फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी; जाणून घ्या शाहरुखच्या ‘पठाण’च्या यशाचं रहस्य काय?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …