जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा डंका; 18 व्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan box office Day 18: अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट खास आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर ठरला आहे. पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. आता 18 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात पठाण चित्रपटाचं 18 व्या दिवसाचं कलेक्शन…

शनिवारी (11 फेब्रुवारी) पठाण या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 924 कोटींचा टप्पा पार केला आहे. शनिवारी (11 फेब्रुवारी) या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर 11 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या भारतातील आतापर्यंतच्या  कमाईनं 459.25 कोटींचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती तरण आदर्श यांनी ट्वीटमधून दिली आहे.  आता भारतामध्ये 500 कोटी आणि जगभरामध्ये 1000 कोटींच्या क्लबमध्ये पठाण सामील होईल का? या प्रश्नाचं उत्तर शाहरुखच्या चाहत्यांना लवकरच मिळाले. 

पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू  या भाषांमध्ये पठाण हा चित्रपट रिलीज झाला. 

हेही वाचा :  Shiv Thakare Exclusive : मी खचणार नाही, आता कुठे प्रवास सुरु झालाय : शिव ठाकरे

पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती

पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बेशरम रंग या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Pathan Fans in Germany: कडाक्याच्या थंडीत जर्मनीमधील चाहते थिरकले ‘झुमे जो पठाण’वर; व्हायरल व्हिडीओला शाहरुखची भन्नाट कमेंट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …