विषारी किड्याला हात लावताच हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक

Toxic Caterpillars : ट्रिपवर गेलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याने उत्सुकता म्हणून एका विषारी किड्याला  हात लावला. पण या किड्याला हात लावणं त्याला चांगलंच महागात पडलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ (Fifty Shades of Grey) मुळे जगभरात चर्चेत आलेला अभिनेता जेमी डोर्ननची प्रकृती सध्या गंभीर आहे. जेमी डॉर्ननेचा मित्र गॉर्डन स्मार्टने याबाबत माहिती दिली. स्मार्टने दिलेल्या माहितीनुसार जेमी डॉर्ननने एका किड्याला हात लावला, पण त्यानंतर जेमीच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णलयात दाखल केलं. 

जेम डॉर्ननची प्रकृती चिंताजनक
पोर्तुगलच्या गोल्फिंग रिसोर्टमध्ये जेमी डोर्नन (Jamie Dornan) आणि गॉर्डन स्मार्ट हे दोघं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यावेळी जेमीला अस्वस्थ वाटायला लागलं. सुरुवातीला जास्त मद्यपान केल्यामुळे तब्येत बिघडली असेल असं वाटत होतं, पण नंतर एका विषारी केसाळ सुरवंटाला हात लावल्यामुळे जेमीची तब्येत बिधघडल्याचा खुलासा झाला. 

गॉर्डन स्मार्टने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला जेमीच्या डाव्या हाताला मुंग्या आल्यासारखं वाटू लागलं. त्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे जेमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्याला रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला. पण घरी आल्यावर जेमीचा डाव आणि डावा पाय सुन्न झाला आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला. शुद्ध आली तेव्हा जेमी रुग्णालयात होता. 

हेही वाचा :  “आज माझी लहान बिट्टो…”, शाहिद कपूरने शेअर केला लहान बहिणीच्या लग्नातील खास फोटो

डॉक्टरांनी सांगितलं कारण
उपचारानंतर डॉक्टरांनी जेमी डॉर्ननच्या हार्टअटॅकचं कारण सांगितंल. जेमीने एका विषारी केसाळ सुरवंटाला (Toxic Caterpillar) हात लावला होता. त्याचं विष जेमीच्या अंगात भिनलं होतं. परिणामी जेमीला त्रास झाला आणि त्याला हार्ट अटॅक आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विषारी सुरवंटामुळे काही श्वानांचा मृत्यू झाला होता.तर काही तरुणांना हार्टअटॅकचा त्रास झाला होता. सुदैवाने जेमी डॉर्ननचा जीव वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

41 वर्षीय जेमी डॉर्नन हा ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला. याआधी त्याला नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोनमध्ये पाहिलं गेलं. या चित्रपटात आलिया भट्ट आणि गॅल गडोटने भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावरील ‘द टूरिस्ट’ मालिकेतही त्याने काम केलं आहे. 

विषारी सुरवंट म्हणजे काय?
विषारी केसाळ सुरवंट या किड्याचं डोकं लाल असतं. डोक्यावर संपूर्ण शरीरावर केसाळ गुच्छ असत. या किड्याचा स्पर्श झाल्यास त्या जागेवर प्रचंड खाज सुटून नंतर सूज येते. ज्या ठिकाणी किड्याचा दंश होतो तो भाग दोन ते तीन दिवस ठणकतो. विष अंगात भिनल्यास हार्ट अटॅकसारखी स्थितीही उद्भवू शकते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …