‘चित्रपट येतोय म्हणून…’, राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा समारंभ पार पडला. संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अमिताभ बच्चन पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी यावेळी हजेरी लावली. मात्र, सगळे प्रतिक्षा करत होते ते अक्षय कुमारची. प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी अक्षय कुमार अयोध्येला पोहोचू शकला नाही. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिथे जाऊ शकला नाही हे कारण सांगितले त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. 

अक्षय कुमारला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात आलं होतं. मात्र, कामामुळे तो या कार्यक्रमात सहाभागी होऊ शकला नाही. त्याविषयी सांगत अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अक्षयसोबत टायगर श्रॉफ दिसतोय. अक्षय या व्हिडीओत बोलताना दिसतोय की ‘आजचा दिवस संपूर्ण जगात असलेल्या राम भक्तांसाठी खूप-खूप मोठा दिवस आहे. अनेक हजारो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा दिवस आला आहे की खूप मोठा दिवस आहे. रामलल्ला आपल्या घरी अयोध्येच्या राम मंदिरात येत आहेत.’ टायगरसोबतचा हा व्हिडीओ शेअर करत अक्षयनं कॅप्शनमध्ये दिलं की ‘श्रीरामच्या प्राणप्रतिष्ठाच्या शुभदिनी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय श्री राम’

त्यानंतर टायगर श्रॉफ बोलतो की, ‘आपण सगळ्यांनी लहानपणापासून याविषयी इतकं ऐकलं आहे की आज त्या दिवसाला आपल्या डोळ्यासमोर होत असणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आता या गोष्टीची प्रतिक्षा करू शकत नाही की जेव्हा आपण दिवा लावत श्रीराम यांचा उत्सव साजरा करू. आमच्या दोघांकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या पवित्र दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा. जय श्रीराम.’

हेही वाचा :  रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक

अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दर्शन करण्यासाठी जायला हवं होतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आज यालापण 4 वाजता उठवलं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आज तर राम सेतू पाहावाच लागेल.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘याचा कोणता चित्रपट येणार आहे का?’ 

हेही वाचा : VIDEO : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?

दरम्यान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा ‘छोटे मियां बडे मियां’ हा चित्रपट ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. तर याची तारिख ही 24 एप्रिल आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …