Gold Rate: लग्नसराईत सर्वसामान्यांना दिलासा! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Price Today in Marathi: सोन्याच्या दराने आजच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. याचदरम्यान मौल्यवान सोन्याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हाला जर भारतीय सराफा बाजारात सोने खरेदी करायचे असेल तर काळजी करू नका. कारण सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. तुम्ही सोने खरेदी करण्यास उशीर केल्यास येत्या काही दिवसांत त्याचे दर लक्षणीय वाढू शकतात. त्यामुळे जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं आणि चांदीचे दर…  

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे. याचपार्श्वभूमीव सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे, त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा दिलासा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या एनसीआर सराफा बाजारात सोन्याचा भाव 1450 रुपयांनी घसरला आहे. सध्या दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोने 70,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 72130 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 71600 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 65580 रुपये प्रति दहा ग्रॅम असा ट्रेंड होत आहे. 

हेही वाचा :  Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका

 असे आहेत चांदीचे दर 

आज सराफा बाजारात चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका. बाजारात चांदीची किंमत 83,500  रुपये प्रति किलो इतकी नोंदवली गेली आहे.  दरम्यान सोनं पाठोपाठ चांदीच्या ही दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 2300 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा भाव 83,500 रुपये प्रति किलो आहे. यापूर्वी चांदीचा दर 85,800 रुपये प्रति किलो होता. 

सर्वसामान्यांना दिलासा

सध्या लगनसराईचा काळ सुरु आहे. अशातच वाढत्या महागाईमुळे खरेदीकरांना घाम फुटला होता. यामध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं आणि चांदीचे दागिने घेणे परवडत नव्हत. मात्र सर्वसामान्यांना किंचितशा दिलासा मिळाला आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …