“आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं,” रतन टाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Ratan Tata Love Story: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे केवळ त्यांच्या कर्तृत्वासाठी नव्हे तर त्यांच्या नम्र स्वभावासाठी ओळखले जातात. प्राण्यांप्रती असणारी त्यांची भूतदया सर्वप्रचलित आहेच. टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा आज करोडो लोकांसाठी प्रेरणास्थानी आहेत.त्याच्या व्यावसायिक यशाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण लव्ह लाईफची ओळख फार कमी लोकांना होईल. रतन टाटा यांनी आजपर्यंत लग्न केले नाही, अशा परिस्थितीत अनेकांना असे वाटेल की, जर त्यांना असे कोणी सापडले नाही किंवा कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडले नाही. पण खरी गोष्ट मात्र वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये यामध्ये त्यांनी आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं असं म्हटले आहे. चला तर मग रतन टाटांच्या आयुष्यातील त्या सुंदर विषयाबद्दल माहिती करुन घेऊया. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

​रतन टाटांनी लग्न का केले नाही?

असे म्हणतात की खरे प्रेम आयुष्यात एकदाच होते आणि त्यानंतर अशी भावना निर्माण होणं अशक्यच असतं. ही गोष्ट काही खोटी नाही रतन टाटा यांच्यासोबतही असेच काहीसे घडले होते, परंतु त्यांचे लग्न होऊ शकले नाही. आपल्या खऱ्या प्रेमासाठी रतन टाटांनी आजतागायत लग्न केले नाही. त्यांच्या तरुण वयात ज्या मुलीवर प्रेम करत होते तिच्याशी ते लग्न करू शकले नाहीत. त्यानंतर त्याने कधीही प्रेमाचा शोध घेतला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ‘द टाटा ग्रुप’ या कंपनीसाठी समर्पित केले. (वाचा :- डेक्सटर वेब सीरिज पाहून श्रद्धाचे ३५ तुकडे केले, बेवसिरीजचा रिलेशनशिपवर कसा होतो परिणाम? वाचा… )

हेही वाचा :  PM मोदींनी या गोष्टीला दिले 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

​का तुटले नाते

एका मुलाखतीदरम्यान रतन टाटा यांनी स्वतः खुलासा केला की जेव्हा ते लॉस एंजेलिसमधील आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होते, तेव्हा त्यांना एका मुलीशी भेटले कालंतराने ते तिच्या प्रेमात पडले. त्यावेळी त्यांची लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतात सात वर्षांपासून आजारी असलेल्या आजीची काळजी घेण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर रतन टाटा आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परत गेले आणि तिला आपल्यासोबत भारतात घेऊन जाण्याचा विचार करत होते, परंतु तसे झाले नाही. 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे, महिलेच्या पालकांना तिला भारतात पाठवणे सोयीचे मानले नाही. त्यामुळे त्यांचे नाते तुटले. (वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

​आयुष्यात चार वेळा झालं प्रेम

रतन टाटा एकदाच प्रेमात पडले असे नाही. तो त्याच्या आयुष्यात चार वेळा नात्यात गंभीर झाले. सगळ्यात जगत असताना त्यांनी लग्नाचाही विचार केला, मात्र काही कारणास्तव हे प्रकरण चिघळले. यानंतर त्यांनी कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. रतन टाटा म्हणाले होते की कदाचित ते अविवाहित राहिलेलेच बरे, कारण त्यांनी लग्न केले असते तर गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या असत्या. सध्या अविवाहित राहण्याचा ट्रेंड इतक्या वेगाने वाढत आहे की त्याबद्दल अनेक अभ्यास केले गेले आहेत आणि काही चालू आहेत. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं

​व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कोणीतरी आपली काळजी घेणारे असावं. वयाच्या या वळणावर येऊन त्यांना त्यांना कोणीतरी आपलं असावं अशी भावना नेहमी त्यांच्या मनात येऊन जाते. (वाचा :- माझी कहाणी: कशी नशिबाने थट्टा मांडली, ज्या व्यक्तीचा मी प्रचंड तिरस्कार केला, त्याच्याच सोबत लग्न माझं होणार आहे)

​आजकालची मुलं लग्नापासून का दूर जातात?

काही काळापूर्वी एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, पूर्वी जिथे पुरुष महिलांपेक्षा लग्नासाठी जास्त उत्साही असायचे, आता त्यात फरक आहे. बार्बरा डॅफो व्हाइटहेड आणि डेव्हिड पोपेनो यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की तरुण पुरुष लग्नाला वाढीव जबाबदारी आणि वाढत्या खर्चाला ते घाबरतात. त्यामुळे आजकालची मुलं लग्न करण्याापासून लांब जातात. (वाचा :- शोएब मलिकशी लग्न करण्यासाठी सानिया मिर्झाने तोडला होता साखरपुडा, आणि आज या नात्यावर घटस्फोटाचे ढग)

​लग्नाचा दबाव

अविवाहित असण्यामागे लग्नाबाबत कुटुंब, मित्र आणि इतर लोकांचा दबाव कमी होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. पूर्वी जिथे ठराविक वयानंतर लग्न करणे हे निश्चित मानले जायचे, आता लग्न न करण्याचा निर्णयही लोक कोणताही निर्णय न घेता स्वीकारत आहेत. हा दबाव कमी झाल्याने आता लोकांना त्यांच्या इच्छेनुसार लग्न ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. (वाचा :- ‘जिंदगी को बेरंग कर देती है…’, मानसी नाईकच्या त्या’ पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण)

हेही वाचा :  पुरुषांनो केसांची काळजी घेताना फॉलो करा या 5 बेसिक गोष्टी, टक्कल सोडा केस गळणार देखील नाही

​भूतकाळातील गोष्टी

आधुनिक युगात अनेक महिला अविवाहित राहणे पसंत करत आहेत. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या आर्थिक स्थितीत झालेला बदल. एका अभ्यासानुसार, महिलांचे लग्न न होण्यामागील कारणांमध्ये प्रेमात फसवणूक, घरातील कामात अनास्था, लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांमुळे वैयक्तिक आयुष्यातील स्वातंत्र्य गमावण्याची भीती, भूतकाळात अपमानास्पद नातेसंबंधात असल्याचा अनुभव यांचा समावेश असू शकतो. (वाचा :- घटस्फोटाच्या मुद्याला पूर्णविराम!, शोएब मलिकने सानियाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणाला …)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …