ते आनंदी दिवस… रतन टाटांनी ७८ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो केला शेअर, प्रत्येक भावंडांनी शिकावी अशी गोष्ट

प्रत्येकाकरता आदरणीय, वंदनीय आणि आचरणीय असे असलेले रतन टाटा. रतन टाटा हे कायमच आपल्या कृतीतून प्रत्येकाला काही ना काही शिकवत असतात. रतन टाटा यांनी नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो. या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असलेला हा रतन टाटा आणि त्यांचे लहान भाऊ जिम्मी टाटा यांचा फोटो. या फोटोने ७८ वर्षांपूर्वीच्या आणि दोघांच्या बालपणीच्या असंख्य आठवणी ताज्या केल्या. या फोटोंमधून दोन भावंडांच घट्ट नातं अधोरेखित होतं. तसेच रतन टाटा यांनी लिहिलेली कॅप्शन प्रत्येकाच्या काळजाला भिडते. या दोघांच्या नात्यांवरून प्रत्येक भावंडांनी काय शिकावं? (फोटो सौजन्य – Ratan Tata इंस्टाग्राम / iStock)

​रतन टाटा यांची पोस्ट

रतन टाटा यांनी पोस्टमध्ये ७८ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रतन टाटा आणि त्यांचे लहान भाऊ जिम्मी टाटा आहेत. तसेच या दोघांसोबत त्यांचा पाळीव प्राणी देखील आहे. यावरून रतन टाटा यांचे श्वानप्रेम दिसून येतं.

हेही वाचा :  मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

ते आनंदी दिवस. आपल्या दोघांमध्ये कुणीच नव्हतं. (१९४५ साली माझा लहान भाऊ जिम्मी) अशी कॅप्शन देत रतन टाटा यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

(वाचा – ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी))

रतन टाटा यांची पोस्ट

​रतन टाटा यांचा लहान भाऊ

रतन टाटा यांच्या औदार्याची जाणीव प्रत्येकालाच आहे. तसेच त्यांचे लहान भाऊ जिम्मी टाटा आहेत. ते देखील अतिशय साधेपणाने आपलं जीवन जगतात. जिम्मी टाटा हे देखील अविवाहित असून खूप साधं आयुष्य जगतात. जिम्मी टाटा यांचे भाऊ २ बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहतात. तसेच टाटा समूहाशी त्यांनी कोणताही संबंध ठेवलेला नाही. ते या व्यवसायापासून पूर्णपणे लांब आहे.

(वाचा – अभिनेत्रीच्या तीन मुलांचे ३ बाप, तिघांसोबत राहून मुलांचे करते संगोपन… काय आहे ही गोष्ट?))

​जुन्या आठवणींना उजाळा

रतन टाटा यांनी शेअर केलेल्या या फोटोतून फक्त त्यांचीच नाही तर पाहणाऱ्यांच्याही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपल्या भावंडांसोबतचा तो खास क्षण प्रत्येकजण जगले आहेत. आज आपण आपल्या कामात व्यस्त असतो. पण या लहानपणीच्या आठवणीने खूप उत्साह निर्माण करतात.

हेही वाचा :  अभिनेत्री मुमताज यांचा तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस

(वाचा – C Section नंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान))

​पाळीव प्राणी निर्माण करतात एक खास नातं

लहानपणी प्रत्येकाकडे बहुतांश पाळीव प्राणी असतो. या प्राण्यासोबतच्या प्रत्येकाच्या आठवणी खास असतात. तेव्हा भावंडांनी त्या पाळीव प्राण्यासाठी केलेल्या गोष्टी आज आठवणीच्या रुपात सोबत आहेत. त्यामुळे भावंडांनी या आठवणी जपून ठेवणे गरजेचे आहे.

(वाचा – खरा रोमान्स म्हणजे काय? सुधा मूर्तींच्या या टिप्स पालकांनी मुलांशी नक्की शेअर कराव्यात))

​एकमेकांसाठी कृतज्ञ राहणं

भावंड लहान असतो तोपर्यंत सोबत असतो. मात्र मोठं झाल्यावर कधी शिक्षणासाठी तर कधी काही इतर कारणांमुळे आपण वेगळे होतो. पण या आठवणी कायम राहतात. त्यामुळे कायम एकमेकांसाठी कृतज्ञ राहणे हे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही एकमेकांपासून लांब राहिलात तरी प्रेम मात्र तसेच राहते.

(वाचा – हिवाळ्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने भारतात मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या)

​एकमेकांचा चुका विसरून निरागसता जपावी

अनेकदा आपण मोठे होतो तसे अहंकार, राग, द्वेष या भावना निर्माण होतात. कळत नकळत केलेल्या चुका प्रत्येकाच्या स्मरणात राहतात आणि निरागसता आपण विसरून जातो. असं न करता एकमेकांना सांभाळून घेणं हे भावंडांच काम असंत. यामुळे तुमच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

हेही वाचा :  सोनिया गांधींची समाजमाध्यमांवर जाहीर नाराजी, आता राहुल गांधींनी पुरावेच दिले, फेसबुकवर केली सडकून टीका

(वाचा – गे.. नाही तर आम्ही फक्त पालक, आदित्य-अमितने शेअर केली त्यांच्या पालकत्वाची Good News))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …