अभिनेत्री मुमताज यांचा तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस

Mumtaz Workout Video : 60-70 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री  मुमताज (Mumtaz) यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली. मुमताज या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मुमताज या सोशल मीडियावर त्यांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतात. या फोटोमधील त्यांच्या फिटनेसचं अनेक जण कौतुक करतात. नुकताच मुमताज यांनी लेग वर्क आऊट (Leg workout) करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ: 


मुमताज यांनी दारा सिंह आणि धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. काही दिवसांपूर्वी मुमताज यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत  ‘इंडियन आयडल 13’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी धर्मेंद्र आणि मुमताज यांनी त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.


वयाच्या 11 व्या वर्षी  चाइल्ड आर्टिस्ट म्हणून मुमताज यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी ‘फौलाद’, ‘डाकू मंगल सिंह’ यांसारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. मुमताज यांनी बॉलिवूडमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर 13 वर्षांचा ब्रेक घेतला. त्यानंतर त्यांनी  1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘आंधियां’  या चित्रपटामधून कम बॅक केलं. “आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे”  या गाण्यामुळे मुमताज यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 

हेही वाचा :  आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

अपना देश (1972), लोफर (1973), झील के उस पार (1973), चोर मचाये शोर (1974), आपकी कसम (1974), रोटी (1974), प्रेम कहानी (1975) आणि नागिन (1976) या चित्रपटातील मुमताज यांच्या अभिनयाला आणि नृत्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

महत्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …