पैशावरून संसाराची झाली राखरांगोळी, नात्यात आला दुरावा कुठे तुमच्या आयुष्यातही…

‘पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही’ आजच्या काळात जुन्या लोकांची ही म्हण अजिबात खोट नाही. प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहण्याच्या शपत घेणाऱ्या नवरा-बायकोही जोपर्यंत खिशात पैसा आहे तो पर्यंत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. त्यामुळेच अनेक जोडप्यांमध्ये पैशांबाबत अनेक वाद सुरु असतात. अशा परिस्थितीत त्यांचे नाते देखील बिघडू शकते. जर जोडप्यामध्ये एकच व्यक्ती कमवणारा असेल हा वाद जास्त चिघळू शकतो. माणसाच्या आर्थिक गरजा कधीच कमी होत नाहीत. जर तुमच्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्त्व असेल तर हे नाते जास्त काळ टिकू शकत नाही. पैशाच्या वादामुळे बहुतेक लग्न मोडतात. अशा परिस्थितीत नात्यातील आर्थिक समस्यांचा ताण कमी होऊ शकतो. तसेच तुमचे बंध मजबूत करतात. तुमच्या नात्यात पैशाला जास्त महत्त्व देऊ नका. (फोटो सौजन्य :- iStock हे सर्व फोटो प्रतिनिधीक आहे)

या कारणांमुळे जोडप्यांमध्ये पैशांमुळे वाढतो तणाव

या कारणांमुळे जोडप्यांमध्ये पैशांमुळे वाढतो तणाव

लग्नानंतर केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोघांच्याही जबाबदाऱ्या एका बंधनात बांधल्या जातात. लग्नात स्वत:च्या आनंदापेक्षा दुसऱ्याचा आनंद पाहणे जास्त महत्त्वाच असते. कधीकधी लोक इतरांशी बरोबरी करण्यासाठी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू लागतात, ज्यासाठी त्यांना परस्पर मतभेदांमुळे भरपाई द्यावी लागते.

हेही वाचा :  How To Reduce Uric Acid : हिवाळ्यात या ५ पदार्थांपासून लांब रहा, साध्यांमध्ये साचलेले युरिक ऍसिड झटपट बाहेर पडेल

(वाचा :- ‘लग्न करणं गरजेचं आहे का ?’ प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची भन्नाट प्रतिक्रिया)​

पैशाची भांडणे परिस्थिती बिघडवत

पैशाची भांडणे परिस्थिती बिघडवत

आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करताना तुम्ही नाराज झालात किंवा तुमच्या जोडीदाराला नाराज करत असाल तर अशा प्रकारची भांडणे तुमच्या नातेसंबंधासाठी योग्य नाहीत .
लग्नझाल्यावर महागड्या रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत पार्टी करणे, अवाजवी खरेदी या अशा काही समस्या असू शकतात ज्यात तुमचा पार्टनर तुमच्याशी सहमत नाही आणि तुम्हाला या गोष्टींवर खर्च करण्यापासून रोखू शकतो. तुमच्या खर्चावरुन देखील नात्यात भांडण निर्माण होतात.

(वाचा :- सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सुधा मूर्तींनी सांगितला गुरूमंत्र, एकदा वाचून तर पहा संपूर्ण आयुष्य बदलून जाईल) ​

पैशासाठी भांडण करणे योग्य नाही

पैशासाठी भांडण करणे योग्य नाही

पैशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलून तुमची वारंवार चिडचिड होत असेल, तर तुमचा जोडीदार तुमच्याशी पुन्हा त्याबद्दल बोलणे टाळेल. तसेच, तुमची ही वृत्ती तुमच्या पार्टनरला तुमचे छंद आणि भावना शेअर करण्यापासून रोखू शकते. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक या गोष्टी एकट्याने हाताळू लागतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. या गोष्टीमुळेच तुम्ही एखाद्या नात्यामध्ये असूनही एकटे असता.

हेही वाचा :  Salary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?

(वाचा :- आईविना पोर, पण मुलाने मला ओळख दिली, समीर चौगुलेंच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी, असं करा बापलेकाचं नातं घट्ट)

अशा प्रकारे या समस्येवर उपाय

अशा प्रकारे या समस्येवर उपाय

या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जोडीदाराशी शांत आणि मोकळेपणाने संभाषण करणे. यावेळी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही आर्थिक समस्यांबद्दल बोलायला बसता तेव्हा तुमच्या जोडीदारापासून काहीही न लपवता कर्ज, उत्पन्न, खर्च आणि गरजा याबद्दल बोला. यासोबतच तुमच्या जोडीदाराचे नीट ऐका आणि एकत्रितपणे निकालापर्यंत पोहोचा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही एक टीम आहात.

(वाचा :- दिल्ली क्राईममधील वर्दीतील ऑफिसर ते वनपीसमधील ग्लॅमरस अदा, 49 व्या वर्षी शेफाली शाह अगदी फाईन वाईन)

नवरा-बायकोपैकी एकच कमावत असेल तर असे करा मॅनेजमेंट

नवरा-बायकोपैकी एकच कमावत असेल तर असे करा मॅनेजमेंट

नवरा कमावतो आणि बायको घराची सगळी व्यवस्था पाहते जर असे असेल तर तुमच्या कमाईनुसार पतीने न मागता घर चालवण्यासाठी दर महिन्याला पैसे द्यावेत. अशा परिस्थितीत, त्याला कोणत्याही प्रकारे निराश करू नका. असे केल्याने तुमचे घर कमी पैशातही चांगले चालते. अशा परिस्थितीत पत्नीने देखील पैसे वाचवण्याकडे भर द्यावा.

हेही वाचा :  पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि.... व्हिडीओ

(वाचा :- Mahashivratri 2023: कोणी अंगठी घातली तर कोणी जॅकेटवर लिहिले ‘ओम’, बॉलिवूडचे हे कलाकार शिवभक्तीत लीन)

जर दोन्ही भागीदार कमावतात, तर आर्थिक समस्या कशी हाताळायची

जर दोन्ही भागीदार कमावतात, तर आर्थिक समस्या कशी हाताळायची

दोन्ही जोडीदाराच्या कमाईमुळे आर्थिक समस्या सहज सुटतात. एकत्र राहण्याआधी तुमच्या जबाबदाऱ्या वाटून घ्या . असे केल्याने तुम्ही कोणत्याही ओझ्याशिवाय पैशाचे व्यवस्थापन करू शकता.मात्र हे करतानाही अनेकवेळा जोडप्यांमध्ये भांडणे होतात. त्यामुळेच वेळ पडल्यावर एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेण्यास तयार असणे आवश्यक आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …