गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कडाडले; महाविकास आघाडीवर सडकून टीका..

मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजीपार्क येथे संपन्न झाला.

या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली. 

आपल्या भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले,  साडे वाजल्यापासून तयार होतो. अनेकांचे फोन येत होते. मनसैनिकाचे दर्शन घेताना अभिमान वाटतोय. तीन वर्षांपूर्वी येथे मेळावा झाला होता. त्यानंतर दोन वर्ष  मेळावा घेता आला नाही. कोरोना लोकडाऊन. तो काळ कधी आठवला की कधी बरं वाटतं तर कधी भीती वाटते. 
 
एक माणूस कधीच शिवाजी पार्क येथे दिसत नव्हता. पोलिसांचा दांडिया सुरु होता. त्याचा नाईलाज होता. महाराष्ट्र पोलिसांना खास धन्यवाद . २४ तास जगत होते. आज दोन वर्षानंतर इतकं तुंबलंय. मोरी साचलीय. बोळा घालावा कुठून ते कळत नाही. तुम्ही नैराश्य झटकून पुन्हा कामाला लागले. कोरोनाचा लॉकडाऊन विस्मरणात गेला. बरं वाटलं. काही गोष्टी तुमच्या विस्मरणात गेल्या आहेत. फ्लॅश बॅक देतो.

दोन वर्षात झालेल्या घटना विसरून गेलो. २०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक, दररोज नवीन बातम्या. तुम्ही विसरता, ते कस काय विस्मरणात जाऊन आठवेल. २०१९ ची निवडणूक आठवा. शिवसेना आणि भाजप विरोधात कोण? राष्ट्रवादी आणि काँग्रेस. निकाल लागला त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आठवलं की मुख्यमंत्री पद अडीच वर्ष. 

हेही वाचा :  मोठी बातमी । आमदार, खासदारांचे प्रलंबित फौजदारी खटले; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश

नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी व्यासपीठावर एकत्र आलात. मुख्यमंत्रीपदाची टूम निघाली. पण नंतर एके सकाळी जुमलाच जुमला. लग्न कुणाचं आणि नवरी कुठली. मग आवाज आला, ‘ये शादी नाही हो सकती.’ सगळं शांत झालं. एक नंबरचा पक्ष भाजप, दुसरा पक्ष शिवसेना, तिसरा पक्ष कोण? तो तिसऱ्या नंबरचा पक्ष पहिल्या नंबरला भुलवतोय. तुम्हाला काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबर जाण्यासाठी मतदान केलं नव्हतं. पण, आम्ही सगळं विसरून जातो.

भाषण ऐकली. मतदान केलं आणि चित्र वेगळं दिसलं. उद्या तुम्ही कुणालाही फरफटत न्यावं आणि  तुम्ही फरफट जाता. हेच विसरणं सुरूय. मूळ विषय बाजूला न्यायचा. याच गोष्टीचा फायदा घेत आलेत. नवाब मलिक जेलमध्ये गेलेत. याच शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. राष्ट्रवादीचे मंत्री कोण. छगन भुजबळ जे अडीच वर्ष जेलमध्ये होते. माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला फरक काय पडतो. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …