‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अरुंधती हे पात्र तर जसं सगळ्यांना आपलं आपलसं वाटायला लागलं आहे. अरुंधतीचा फक्त लूक बदलला नाही तर ती आता स्वत: च्या पायावर देखील उभी राहिली आहे. पण सध्या मालिकेत एक नवी ट्विस्ट आला आहे.
अरुंधती रेकॉर्डिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथे आलेल्या काही अडचणींमुळे तिला आशुतोषसोबत बाहेर एक रात्र काढावी लागली. त्यावरून अनिरुद्ध आणि आई थेट तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. हा अपमान सहन न झाल्याने या दोघांना खडे बोल सुनावत स्वाभिमानी अरुंधती देशमुख कुटुंबातून कायमस्वरुपी बाहेर पडते. या सगळ्यात आता संजनाचा अर्धा प्लॅन तर यशस्वी झाला. आता संजना अरुंधतीच्या अडचणीत आणखी वाढवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे.
आणखी वाचा : सध्या भुबन बड्याकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका
मिळालेल्या माहितीनुसार, अप्पांनी अरुंधतीला घर सोडून जाताना हिस्सा देण्याचा कबूल केलं होतं. तर अप्पांचा हा निर्णय संजनाला पटलेला नसतो, म्हणून आता घराचा हिस्सा अरुंधतीकडून परत घेण्याचा प्लॅन संजना करते. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सगळ्यात कांचनही तिची मदत करते.
आणखी वाचा : सुप्रिया सुळेंनी लावली होती अंबानींच्या मुलाच्या लग्नाला हजेरी, पाहा फोटो
दरम्यान, एवढ्या सगळ्या अडचणी समोर असताना आशुतोष लवकरच अरुंधतीवरील प्रेमाची कबुली देणार आहे. त्यामुळे यावर अनिरुद्धसह देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच अरुंधतीची यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.