उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, एकाही घोटाळेबाजाला सोडणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन (Pushpak Bullion) या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पाील (Nilambari Project) 11 सदनिका सील करण्यात आल्या असून जप्त केलेली मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे. 

यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.  मुंबई महापालिका (Mumbai Municipal) लुटण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनी श्रीधर पाटणकर यांना दिला होता. कंत्राटदाराकडून कसे पैसे येतात, शेल कंपन्या, २४ शेल कंपन्यांची नावं, कशाप्रकारे नामीबेनामी इन्व्हेस्टमेंट होती यावर आता तर ईडीने सुरुवात केली आहे, अजून आयकर विभाग येणं बाकी आहे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी छगन भुजबळ यांनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रींग केलं त्या कंपन्यांमधूनही मनी लॉन्ड्रींग केलं. सुनील तटकरे यांनी ज्या कंपन्यांमधून केलं त्या कंपन्यांमधूनही मनी लॉन्ड्रींग केलं. हळू हळू सर्व हिशोब समोर येणार आहे, हा पैसा श्रीधर पाटणकर यांच्या अकाऊंटमधून पुढे कुठे कुठे गेला आहे, हे ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेला कळेल ना तेव्हा उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा :  तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...

एकही घोटाळेबाजांना सोडणार नाही, मग ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, त्यांचा डावा हात असो की उजवा हात असो, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

या घोटाळेबाजांविरोधात मी गेली दीड वर्ष लढतोय, आता अॅक्शन सुरु झाली आहे, उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेने ज्या पद्धतीने माफियागिरी सुरु केलेली आहे, तो सर्व पैसा वसूल केला जाणार, लूटीचा पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करावाच लागेल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

पाटणकर यांनी दोन डझन शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले आहेत, श्रीधर पाटणकरच्या अकाऊंटमधून कुठे कुठे पैसे पोहचवले गेले आहेत हे जेव्हा बाहेर येईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना उत्तर देता येणार नाही. 

हा सर्व पैसा महापालिकेचे कंत्राटदार आणि ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांकडून आलेला आहे, सर्व हिशोर जनतेसमोर ठेवणार असा आव्हानही किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …