घरातील जुना- वापरात नसलेला फीचर फोन फेकुन देण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे ‘हे’ बेनिफिट्स

नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन्सची इतकी क्रेझ नव्हती. तेव्हा फक्त फीचर फोनच बाजारात खूप ट्रेंडिंग होते आणि लोक ते मोठ्या प्रमाणात खरेदी करायचे. विशेष बाब म्हणजे, फीचर फोनची किंमत त्यावेळी स्मार्टफोनच्या किमती एवढीच होती. स्मार्टफोन बाजारात आले नसल्यामुळे ग्राहकांना दुसरा पर्याय नव्हता. फीचर फोनमध्ये, कॉलिंग आणि मेसेजिंग व्यतिरिक्त, युजर्स गेम खेळू शकायचे किंवा GPRS वापरू शकायचे. परंतु, यापेक्षा जास्त काहीच त्यात करता येत नव्हते. काळ बदलला आणि काळाच्या ओघात स्मार्टफोनची एंट्री झाली, मग लोकांनी हे फीचर फोन घेणे बंद केले आणि हळूहळू त्यांची विक्री पूर्णपणे कमी झाली. पण, हे फीचर फोन अनेक बाबतीत चांगले होते, ज्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणताही फीचर फोन असेल तर त्याला फेकून न देता त्याचा पुन्हा वापर करा. पाहा टिप्स.

वाचा: Reliance Jio मोठा धमाका करण्याच्या तयारीत, युजर्सना मिळणार १०० Gbps इंटरनेट स्पीड, पाहा डिटेल्स

पर्यायी फोन म्हणून वापर करता येईल: तुमच्या घरात लहान मुले किंवा वयस्कर व्यक्ती असतील ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नसेल पण फोनची आवश्यकता असेल. तर, तुम्ही त्यांना फीचर फोन देऊ शकता. जेणेकरून कॉलिंग आणि मेसेजिंग सहज करता येईल. तुम्‍हाला हवे असेल तर तुम्‍ही हा फोन सोबत ठेवू शकता, हे सांगण्यामागील कारण म्हणजे, स्‍मार्टफोन बॅटरी खूप जलद वापरतात आणि अनेक वेळा स्‍मार्ट फोन लवकर डिस्चार्ज होतो. अशा वेळी तुमच्याकडे फीचर फोन असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने कॉल करू शकता. ते आकाराने लहान असतात. त्यामुळे ते कॅरी करण्यास अतिशय सोपे असतात. तसेच, त्यांना एकदा चार्ज केल्यानंतर आठवडाभर चालतात. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासत नाही.

हेही वाचा :  या कारणामुळे गंगेत आत्महत्या करायला निघाले होते Kailash Kher, अशा लोकांना विषासमान वाटतात ५ गोष्टी

नेटवर्कची समस्या येणार नाही: फोनमध्ये नेटवर्क नसल्याची तक्रर युजर्स नेहमी करत असतात. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल तर तुम्ही फीचर फोन वापरयला हवा. फीचर फोनमधील नेटवर्क खूप चांगले असते आणि कॉलिंग-मेसेजिंग दरम्यान कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे जर तुम्ही कामानिमित्त सतत प्रवास करत असाल आणि तुम्हाला दिवसभर खूप कॉलिंग करावे लागत असेल तर एक फीचर फोन नक्कीच जवळ ठेवा. ज्यामुळे तुम्ही सहज कॉल करू शकता आणि तुमच्या कॉलिंगमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही.

वाचा: Apple घालणार धुमाकूळ, सर्वात स्वस्त 5G iPhone च्या लाँच डेटचा खुलासा, किंमतही आली समोर,पाहा डिटेल्स

वाचा: Valentine’s Day ला तुमच्या घरालाच डिस्को बनवतील हे स्पीकर्स, गिफ्ट देण्यासाठीही बेस्ट पर्याय

वाचा: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या ‘या’ दमदार स्मार्टफोन्सची लिस्ट पाहा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,’ भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो ‘भारतीय घाणेरडे, वरणाचा वास…,’

अॅप्पलने नुकतीच आपली नवी सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. दरम्यान अॅप्पलने भारतात निर्मिती करण्यात …

पुन्हा आला बंपर सेल! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर कुठे किती डिस्काउंट? यादीच पाहा

Amazon Great Indian Festival 2023 sale: 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झाले तर पाच दिवसांच्या …