रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) मध्ये साहाय्यक या ९५० पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
एकूण जागा : ९५०
पदाचे नाव :
साहाय्यक (RBI Assistant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Office चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूर देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया :
सुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. त्यानंतर डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.
भरती शुल्क :
Gen / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 450/- रुपये
SC / ST / PH / ESM मागासवर्गातील उमेदवारांसाठी – 50/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

